शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
2
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
3
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
4
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
5
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
6
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
7
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
8
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
9
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
10
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
11
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
12
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
13
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
14
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
15
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
16
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
17
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
18
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
19
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का
20
'सोन्याची आहे की चंद्रावरून आणलीत?'; प्राडाच्या सेफ्टी पिनचा सोशल मीडियावर धुमाकूळ! किंमत किती?

सांगली महापालिकेच्या उद्यानातून चंदनाच्या झाडाची चोरी

By शीतल पाटील | Updated: October 4, 2022 19:23 IST

काही दिवसांपुर्वी पोलिस अधीक्षकांच्या निवासस्थान परिसरातूनच चंदनाच्या झाडांची झाली होती चोरी

सांगली : महापालिकेच्या महावीर उद्यानातून चोरट्याने चंदनाच्या झाडाची चोरी केली. ही घटना सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. सकाळी मार्निंग वाॅकसाठी आलेल्या नागरिकांना चोरीची बाब निदर्शनास आली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. रात्री उशिरापर्यंत या घटनेची पोलिसांत नोंद नव्हती.अधिक माहिती अशी, की चोरी, शहरात चंदनाच्या झाडाची चोरी करणारी टोळी सक्रीय आहे. काही दिवसांपुर्वी पोलिस अधीक्षकांच्या निवासस्थान परिसरातूनच चंदनाच्या झाडांची चोरी झाली होती. या चोरीचा छडा लावत पोलिसांनी चोरट्यांना जेरबंद केले होते. दरम्यान सोमवारी मध्यरात्री महावीर उद्यानात चंदनाच्या झाडाची चोरी झाल्याची घटना समोर आली. मध्यरात्री चार ते पाच चोरट्यांनी उद्यानात प्रवेश केला. तेथील चंदनाच्या झाडाची इलेक्ट्रीक कटरसहायाने तोडणी केली. त्यानंतर पुढे मोकळ्या जागेत झाडाचे तुकडे केले आणि बुंदे घेवून चोरटे पसार झाले.सकाळी फिरायला आलेल्या लोकांना झाड तोडल्याची माहिती मिळाली. त्याठिकाणी काही वस्तूही पडल्याचे दिसून आले. त्यानंतर महापालिकेच्या उद्यान विभाग व पोलिसांना याची माहिती देण्यात आली. विश्रामबाग पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक अमितकुमार पाटील, वनविभागाचे मानद वन्यजीव रक्षक अजितकुमार पाटील, सहायक फौजदार अनिल ऐनापुरे, आदिनाथ माने, विलास मुंढे, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे अंमलदार बिरोबा नरळे, सागर लवटे यांच्यासह पथक दाखल झाले होते. त्यांनी पाहणी केली असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. रात्री उशीरापर्यंत या घटनेची नोंद विश्रामबाग पोलिस ठाण्यात नव्हती.

दुसऱ्या प्रयत्नात यश

महावीर उद्यानातील चंदनाच्या झाडाची चोरी करण्याचा प्रयत्न काही दिवसांपूर्वी झाला होता. झाड तोडताना आवाज झाल्याने सुरक्षा रक्षक बाहेर आले. त्यावेळी चोरट्यांनी पळ काढला होता. सोमवारी मध्यरात्री मात्र चोरट्यांनी झाडाच्या फांद्या दोरीने बांधून बुंदा चोरी करून नेण्यात चोरटे यशस्वी झाले.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारी