शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
2
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
3
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
6
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
7
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
8
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
9
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
10
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
11
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
12
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
13
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
14
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
15
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
16
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
17
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
18
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
19
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
20
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी

सम्राट महाडिक १००% आमदार होणार म्हणजे होणारच : जेष्ठ नेते अण्णासाहेब डांगे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2023 17:40 IST

शिराळा मतदार संघात राजकीय चर्चा सुरू.

विकास शहा

शिराळा-  राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी ग्रामीण विकास मंत्री अण्णासाहेब डांगे यांनी भावी आमदार सम्राट महाडीक असा उल्लेख करताच टाळ्या वाजल्यावर टाळ्या कमी पडतात असे म्हणून  भावी आमदार सम्राट महाडीकच १००% होणार म्हणजे होणारच ! असे सांगितले आहे. काही दिवसांपूर्वी कोल्हापूर येथील भाजपच्या सभेत अण्णासाहेब डांगे यांनी हजेरी लावली होती, आणि त्यांनी आज विधान केलं आहे.

 रेड ( ता.शिराळा) येथील एका पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक, माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची उपस्थिती होती.

या विधानसभा मतदारसंघात शिराळा व वाळवा तालुक्यातील ४८ गावे येतात. याचबरोबर मतदार संख्याही वाळवा तालुक्यातील गावातील जास्त आहे. यामुळे निवडणुकीत वाळवा तालुक्यातील मतदारांवर मोठी भिस्त असते. माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांना २०१४ मध्ये भाजप मधून उमेदवारी मिळाली व ते निवडून आले होते. त्यावेळी सत्यजित देशमुख यांना काँग्रेस मधून उमेदवारी मिळाली होती त्यात त्यांना ४५१३५ मते मिळाली होती.

मात्र २०१९ ला पुन्हा राजकीय गणित बदलले. माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सत्यजित देशमुख यांनी भाजप मध्ये प्रवेश केला. त्यामुळे शिवाजीराव नाईक व सत्यजित देशमुख हे दोन गट एकत्र आले. आत्तापर्यंत च्या राजकीय इतिहासात जे दोन गट एकत्र येतील त्यांचा विजय नक्की असायचा. या दोघांना मिळून २०१४ च्या निवडणुकीत १ लाख ३० हजार ४९८ मते पडली होती. त्यामुळे शिवाजीराव नाईक हे नक्की विजयी होतील असे गणित मांडले गेले. मात्र शिवाजीराव नाईक व सत्यजित देशमुख हे दोन गट एकत्र आले प्रत्यक्षात आमदार मानसिंगराव नाईक यांनी २५९३१ एवढ्या मोठ्या फरकाने विजय मिळविला होता. 

या निवडणुकीत सम्राट महाडिक हे अपक्ष उमेदवार म्हणून लढवत होते. सम्राट यांच्या बरोबर त्यांचे बंधू राहुल महाडिक यांची मोठी साथ मिळाली होती. त्यांच्याविरुद्ध माजी मंत्री जयंतराव पाटील , शिवाजीराव नाईक , मानसिंगराव नाईक , सत्यजित देशमुख  यांची मोठी फळी कार्यरत होती. २०१४ मध्ये सत्यजित देशमुख यांना काँग्रेस ची उमेदवारी असून ४५१३५ मतदान पडले होते मात्र सम्राट महाडिक यांनी अपक्ष तसेच पुढे दिग्गज असताना सुद्धा ४६२३९ मते मिळवली होती. या त्यांच्या पडलेल्या मतांमुळे त्यांनी आपल्या गटाची ताकद दाखवली होती. तसेच नाईक- देशमुख गट एकत्र आले त्यामध्ये ५४४९६ मतांचा फटका बसला होता.

सम्राट महाडिक तसेच सत्यजित देशमुख यांनी विधानसभेसाठी मोर्चे बांधणी सुरू केली आहे. मंत्री चंद्रकांत पाटील यांना कोल्हापूर येथील राजकारणात महाडिक कुटुंबियांची मोठी मदत असते त्यामुळे सम्राट महाडिक यांची विधानसभे साठी  तर सत्यजित देशमुख यांना विधानपरिषद अथवा लोकसभेची उमेदवारी अशी चर्चा आहे.१)२०१४ विधानसभा निवडणुकीत पडलेली मते-

 शिवाजीराव नाईक ( भाजपा)८५३६३(३६६८ मतांनी विजयी)मानसिंगराव नाईक(राष्ट्रवादी) ८१६९५सत्यजीत देशमुख(काँग्रेस) ४५१३५

२)२०१९ शिराळा विधानसभा  मिळालेली मते

    (१) मानसिंग फत्तेसिंगराव नाईक(राष्ट्रवादी)  १,०१,९३३ (२५९३१ मतांनी विजयी)(२)शिवाजीराव यशवंतराव नाईक (भाजप)  ७६००२(३) सम्राट नानासाहेब महाडिक अपक्ष ४६२३९

टॅग्स :BJPभाजपा