शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

अमली पदार्थांची विक्री मिरज शहरामध्ये जोमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2019 15:44 IST

मिरजेत गांजासह अमली पदार्थांची तस्करी जोमात सुरू असून, रेल्वे स्थानक, बस स्थानक परिसर अमली पदार्थ विक्रीची केंद्रे बनली आहेत. अमली पदार्थांच्या व्यसनींकडून प्रवाशांच्या लूटमारीचे प्रकार सुरू आहेत.

ठळक मुद्देअमली पदार्थांची विक्री मिरज शहरामध्ये जोमातव्यसनींकडून प्रवाशांच्या लूटमारीचे प्रकार

मिरज : मिरजेत गांजासह अमली पदार्थांची तस्करी जोमात सुरू असून, रेल्वे स्थानक, बस स्थानक परिसर अमली पदार्थ विक्रीची केंद्रे बनली आहेत. अमली पदार्थांच्या व्यसनींकडून प्रवाशांच्या लूटमारीचे प्रकार सुरू आहेत.पोलिसांनी पकडलेल्या गांजा तस्कराने दिलेल्या कबुलीमुळे, कर्नाटकातून मोठ्या प्रमाणात गांजाची आयात सुरू असल्याचे निष्पन्न झाले आहे. गांजा, चरस यासारख्या अमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.रेल्वे जंक्शन, वैद्यकीय नगरी, संगीत परंपरा यासाठी ख्याती असलेल्या मिरजेत गांजासह अमली पदार्थांची तस्करी जोमात सुरू असल्याचे चित्र आहे. शहरात विविध ठिकाणी गांजाच्या अड्ड्यांवर अमली पदार्थांचा पुरवठा करणाऱ्या टोळ्या कर्नाटकातून गांजा, चरस यासारख्या अमली पदार्थांची आयात करून त्यांची शहरात विक्री करीत आहेत. रेल्वे स्थानक, शहरी बस स्थानक, उत्तमनगर, कृष्णाघाट रोड, शास्त्री चौक, ख्वाजा वसाहत, स्टेशन रोड, दर्गा परिसरात गांजा विक्रीचे व व्यसनींचे अड्डे आहेत.अमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या व्यसनींकडून रेल्वे स्थानक, बस स्थानकात येणाऱ्या प्रवाशांना अडवून त्यांना शस्त्राचा धाक दाखवून लुटण्याचे प्रकारही सुरू आहेत. तस्करांवर प्रभावी कारवाई होत नसल्याने गांजाची आयात व विक्री सुरूच आहे. गांजाच्या १० ग्रॅमच्या पुड्या विक्री करण्यात येतात. रेल्वे स्थानक, ख्वाजा वसाहत परिसरात ५० ते १०० रुपयास गांजा विक्री सुरू आहे.कळी गांजा, लाल गांजा, हिरवा गांजा अशा वेगवेगळ्या दर्जाच्या गांजाच्या पुड्या सहज उपलब्ध होतात. गांजापासून तयार होणारा चरस ७० हजार रूपये प्रति किलो आहे. पोलिसांच्या गांजा तस्करांवरील कारवाईमुळे गांजा विक्रीला पायबंद बसला होता. मात्र, गेल्या काही वर्षांपासून अमली पदार्थांची तस्करी पुन्हा सुरू झाली आहे.गांजावर कारवाईसाठी मोठ्याप्रमाणात गांजा सापडणे आवश्यक आहे. मात्र काही ग्रॅमच्या छोट्या पुड्या विक्री करणाऱ्या तस्करांवर कारवाई करणे पोलिसांना अवघड होत असल्याने, तस्करांचे फावले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSangliसांगली