आष्टा : येथील आष्टा पश्चिम भाग विकास सेवा सोसायटीच्या स्वीकृत संचालकपदी साजिद आयुबखान इनामदार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. संस्थेचे संस्थापक वैभव शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये इनामदार यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
साजिद इनामदार यांच्या निवडीची सूचना वैभव शिंदे यांनी मांडली व त्याला अनुमोदन संचालक धैर्यशील शिंदे यांनी दिले. निवडीनंतर इनामदार यांचा माजी नगराध्यक्ष झुंझारराव शिंदे यांनी सत्कार केला.
यावेळी अध्यक्ष दिनकर बसुगडे, उपाध्यक्ष मारुती रेवले - पाटील, संचालक माणिक शिंदे, प्रदीप ढोले, राजू इनामदार, बाळासाहेब बसुगडे, निशिकांत शिंदे, अॅड. राम बसुगडे, विजय हाबळे, वरदराज शिंदे, खंडेराव सावंत, प्रकाश बसुगडे, विकास माळी, दीपक थोटे, सागर जगताप, राजू शिंदे, दत्तराज हिप्परकर उपस्थित होते.
फोटो - ०७०२२०२१-आयएसएलएम- आष्टा निवड न्यूज
साजिद इनामदार यांचा सत्कार करताना माजी नगराध्यक्ष झुंजारराव शिंदे, वैभव शिंदे यांच्याहस्ते केला. यावेळी दिनकर बसुगडे, राजू इनामदार उपस्थित होते.