शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: दुष्काळ निधीवर डल्ला मारणाऱ्या कर्मचाऱ्यांना बडतर्फ करा - सुनील फराटे 

By अशोक डोंबाळे | Updated: May 25, 2024 18:40 IST

जिल्हा बँकेच्या घोटाळ्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवरही गुन्हे दाखल करा

सांगली : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अनामत खात्यातून दुष्काळग्रस्तांच्या रकमेवर डल्ला मारणाऱ्या कर्मचाऱ्यांवर तत्काळ बडतर्फची कारवाई झाली पाहिजे, तसेच दोन कोटींहून अधिकचा घोटाळा होत असताना अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याबद्दल त्यांच्यावरही फौजदारी कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील फराटे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.स्वतंत्र भारत पक्षातर्फे दिलेल्या निवेदनात म्हटले की, जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती बँक ही अग्रगण्य बँक आहे. जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्य नागरिक यांचे सर्व व्यवहार व ठेवी या बँकेत आहेत. जिल्ह्यातील सहकारी संस्था म्हणजेच साखर कारखाने, सूत गिरण्या, प्रक्रिया संस्थेसह इतर सहकारी संस्थांना आर्थिक साहाय्य देते, म्हणूनच या बँकेला जिल्ह्याची अर्थवाहिनी संबोधली जाते.जिल्हा बँकेकडे दुष्काळ, अतिवृष्टी आणि पीकविमा भरपाईचा निधी शासनाने दिला आहे. हा निधी हा ज्या-त्यावेळी शेतकऱ्यांच्या खाती जमा न करता, तो अनामत खाती शिल्लक ठेवला आहे. या निधीवरती बँकेतील काही कर्मचाऱ्यांनी डल्ला मारलेला आहे. याबाबतची व्याप्ती पाहता अपहारीत रक्कम अंदाजे सहा ते सात कोटी असल्याचे दिसत आहे. अपहाराची व्याप्ती पाहता, रक्कम अंदाजापेक्षा कितीतरी पटीने वाढण्याची शक्यता आहे. अपहाराबाबत बँकेच्या काही अधिकाऱ्यांची टीम बनवून चौकशीचा फार्स केला जात आहे. त्यामुळे चौकशी पारदर्शकपणे होऊन अपहारित रक्कम वसूल होणे गरजेची आहे. संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांवर फौजदारीची कारवाई होणे अपेक्षित आहे. शासनाचा निधी शेतकऱ्यांना वर्ग झाला नसेल, तर तो निधी शासनाकडे परत पाठविण्याची जबाबदारी ही बँकेची आहे. तथापि, बँकेने व बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या बाबीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.अपहारित रक्कम ही शासनाचा निधी असल्यामुळे शासनाच्या निधीचा गैरवापर झाल्याने, जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी करून बँकेच्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणे गरजेचे आहे. दोन अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची गरज आहे. या बँकेकडे फार मोठ्या प्रमाणात अपहार, गैरव्यवहाराची प्रकरणे घडत आहेत. शासकीय निधी परत न केल्याप्रकरणी जिल्हा बँकेच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणीही जिल्हाधिकारी डॉ.राजा दयानिधी यांच्याकडे केली आहे.

टॅग्स :Sangliसांगलीdroughtदुष्काळbankबँक