कामेरी : कामेरी (ता. वाळवा) येथे रिपब्लिकन पक्षाच्या सांगली जिल्हा सरचिटणीसपदी निवड झाल्याबद्दल सचिन जाधव यांचा सांगली जिल्हा ओबीसी समाज संघटना व सांगली जिल्हा गुरव समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील गुरव यांनी सत्कार केला.
यावेळी सुनील गुरव म्हणाले, सचिन जाधव हे एक कुशल संघटक आहेत. केवळ समाजातील एका घटकापुरते त्यांचे कार्य मर्यादित नसून, ओबीसी समाजासाठीसुद्धा त्यांचे काम आहे. त्यांच्या निवडीचा रिपब्लिकन पक्षासह दलित, ओबीसी समाजालासुद्धा मोठा सामाजिक व राजकीय फायदा होणार आहे. यावेळी पुणदीचे सरपंच नागेश गुरव, शिराळा तालुका कामगार परिषदेचे अध्यक्ष मारुती रोकडे, शिवसेनेचे सांगली जिल्हा उपप्रमुख नंदकुमार नीळकंठ, रिपब्लिकन पक्षाचे वाळवा तालुकाध्यक्ष सुधीर कांबळे, सांगली जिल्हा शिक्षक संघाचे अध्यक्ष मुकुंद सूर्यवंशी, धनाजी माने, सुनीता अष्टेकर, रोहित अष्टेकर, अनिकेत पवार उपस्थित होते.