सांगली : अग्रण धुळगाव (ता. कवठेमहांकाळ) येथील सामान्य कुटुंबातील सचिन भोसले याची विजय हजारे रणजी ट्रॉफी स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे. सचिन भोसलेला बालपणापासूनच क्रिकेटची आवड होती. पुढे सांगलीत बीसीएसचे शिक्षण घेत असताना शिवाजी विद्यापीठाच्या क्रिकेट संघात निवड झाली होती.सध्या पुणे येथे क्रिकेट सराव करत असताना विजय हजारे रणजी ट्रॉफीच्या निवडीसाठी आयोजित चाचणी सामन्यामध्ये सचिन भोसलेला खेळण्याची संधी मिळाली. या चाचणी सामान्यातून त्याची महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे.
सचिन भोसलेची रणजी ट्रॉफीसाठी निवड
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2022 17:35 IST