एस. टी. प्रवाशांच्या सापडलेल्या दागिन्यांचा सोमवारी लिलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:19 AM2021-06-26T04:19:03+5:302021-06-26T04:19:03+5:30

सांगली : प्रवाशांच्या एस. टी.त विसरलेल्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांचा लिलाव सोमवारी (दि. २८) येथील विभागीय कार्यालयात आयोजित केला आहे. या ...

S. T. Monday's auction of jewelry found by passengers | एस. टी. प्रवाशांच्या सापडलेल्या दागिन्यांचा सोमवारी लिलाव

एस. टी. प्रवाशांच्या सापडलेल्या दागिन्यांचा सोमवारी लिलाव

googlenewsNext

सांगली : प्रवाशांच्या एस. टी.त विसरलेल्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांचा लिलाव सोमवारी (दि. २८) येथील विभागीय कार्यालयात आयोजित केला आहे. या ऐवजाची किमान किंमत दीड लाख रुपये निश्चित केली आहे. प्रभारी विभाग नियंत्रक अरुण वाघाटे यांनी ही माहिती दिली.

प्रवासादरम्यान अनेक प्रवाशांचे दागिने एस. टी.तच हरवतात किंवा प्रवासी विसरुन जातात. चालक-वाहक आणि सफाई कर्मचारी ते आगारात जमा करतात. संबंधित प्रवासी दागिन्यांसाठी आला तर खातरजमा करुन परत दिले जातात. त्यानंतरही बेनामी राहिलेले दागिने एस. टी.कडेच राहतात. जिल्हाभरातील आगारांमध्ये जमा झालेले हे दागिने विभागीय कार्यालयात ठेवण्यात आले आहेत. गेल्या सुमारे दीड वर्षांपासून त्यांचा लिलाव झालेला नव्हता. सोमवारी सकाळी ११ वाजता तो होईल. यामध्ये सोने व चांदीचे पैंजण, ब्रेसलेट, अंगठी, मंगळसूत्र, गंथन, डोरले, मणी, बोरमाळ, नाणी, जोडवी, बिंदल्या, कर्णफुले आदींचा समावेश आहे.

Web Title: S. T. Monday's auction of jewelry found by passengers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.