शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

Russia Ukraine War: भुकेने व्याकुळ, दोन दिवस सात अंश तापमानात भयावह प्रवास, विद्यार्थ्यांचे भयान अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2022 17:33 IST

कसबे डिग्रजमधील प्रथमेश सुनील हंकारे आणि तुंगचा अभिषेक प्रकाश पाटील याने सांगितले अनुभव

सांगली : ‘चाळीस किलोमीटर टॅक्सीच्या प्रवासासाठी सहा हजार रुपये मोजले. नंतर दोन दिवस-दोन रात्री कडाक्याच्या थंडीत चालत पोलंडमध्ये पोहोचलो. सात अंश तापमान होते. भुकेने व्याकुळ झालो होतो. पण सुरक्षित पोहोचल्यानंतर सुटकेचा नि:श्वास टाकला...’, प्रथमेश हंकारे आणि अभिषेक पाटील सांगत होते. दोघेही गुरुवारी रात्री युक्रेनमधून गावाकडे पोहोचले. शुक्रवारी सकाळी ‘लोकमत’च्या प्रतिनिधीने त्यांच्याशी संपर्क साधला.युक्रेनवर रशियाने केलेल्या हल्ल्यानंतर तेथील भारतीय विद्यार्थ्यांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागला. सगळे विद्यार्थी मायदेशी परतू लागले. मिरज तालुक्यातील कसबे डिग्रजमधील प्रथमेश सुनील हंकारे आणि तुंगचा अभिषेक प्रकाश पाटील यांचाही त्यात समावेश होता. युक्रेनमधील लिव्हिव नॅशनल इन्स्टिट्यूटमध्ये हे दोघे वैद्यकीय शिक्षण घेत आहेत. ते गुरुवारी रात्री उशिरा गावाकडे परतले आणि कुटुंबातील मंडळींना हायसे वाटले.प्रथमेश म्हणाला, ‘लिव्हिवजवळचे विमानतळ बॉम्बच्या वर्षावाने उडविण्यात आले होते. सगळीकडे भीतीचे वातावरण होते. क्षेपणास्त्रांचे हल्ले सुरू होते. रस्त्यांवर रणगाडे दिसत होते. त्यामुळे आम्ही सगळे भारतीय विद्यार्थी तेथून निघालो. आम्ही पोलंडच्या दिशेने वाटचाल सुरू केली. लिव्हिवपासून सुमारे ७० किलोमीटरवर पोलंड आहे. चाळीस किलोमीटर टॅक्सीच्या प्रवासासाठी सहा हजार रुपये मोजले. नंतर दोन दिवस-दोन रात्री कडाक्याच्या थंडीत चालत पोलंडमध्ये पोहोचलो. सात अंश तापमान होते. भुकेने व्याकुळ झालो होतो.’अभिषेक म्हणाला, ‘सुमारे दीडशे भारतीय विद्यार्थी आमच्यासोबत होते. त्यानंतर भारतीय दूतावासाने मोठ्या प्रमाणात मदत केली. जेवण-खाणे, प्रवास आणि इतर अनेक प्रकारची मदत मिळाली. हवाईदल, इंडिगो आणि एअर इंडियाच्या विमानसेवेने मायदेशात परत आलो.’गुरुवारी रात्री उशिरा दोघे गावात परतले. आता या विद्यार्थ्यांना भविष्यातील शिक्षण कसे होणार याबाबत चिंता आहे.

टॅग्स :SangliसांगलीRussia Ukrainयुक्रेन आणि रशिया