शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
7
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
8
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
9
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
10
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
11
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
12
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
13
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
14
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
15
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
16
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
17
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
18
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
19
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं

डॉलरच्या तुलनेत रुपया निचांकी स्तरावर, परदेशी शिक्षण आवाक्याबाहेर

By संतोष भिसे | Updated: October 14, 2022 17:45 IST

शैक्षणिक कर्ज काढून परदेशात शिक्षण घेणारे विद्यार्थी व त्यांच्या पालकांची आर्थिक कोंडी

सांगली : जुलै महिन्यापासून डॉलरची किंमत सतत वधारत असल्याने परदेशी शिक्षण महागले आहे. युक्रेनमधील युद्धस्थितीमुळे भारतात परतलेल्या विद्यार्थ्यांना याचा मोठा फटका बसला आहे. विमानप्रवासासह तेथील घरभाडे आणि खानपानाचीही भरमसाट दरवाढ झाली आहे.डॉलरच्या तुलनेत सध्या रुपया निचांकी पातळीवर घसरला आहे. शैक्षणिक कर्ज काढून परदेशात शिक्षण घेणारे विद्यार्थी व त्यांच्या पालकांची यामुळे आर्थिक कोंडी झाली आहे. डॉलर वधारल्याने युक्रेनचे विमानभाडेही दुप्पटीपर्यंत वाढले आहे. नोव्हेंबरपर्यंतचे विमानांचे बुकींग फुल्ल झाले आहे. मुंबईतून बोल्गेव्हचे विमानभाडे सरासरी ५० ते ६० हजार रुपयांवर पोहोचले आहे. पोलंड, रुमानिया यांचेही प्रवासभाडे वाढले आहे. युक्रेनमध्ये थेट प्रवासी विमानसेवा बंद आहे, त्यामुळे शेजारच्या देशांपर्यंत विमानाने जाऊन युक्रेनमध्ये रस्त्याने प्रवेश करावा लागतो. यामुळेही खर्चात वाढ झाली आहे.अमेरीका, ब्रिटनसह काही देशांत विद्यार्थी पार्टटाईम नोकऱ्या करुन शिक्षणाचा खर्च भागवतात. पण सध्या नोकऱ्याही दुर्मिळ झाल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. एकेका नोकरीसाठी दहाजणांचे अर्ज येत आहेत. गतवर्षी एका अमेरीकन विद्यापीठाचे शुल्क १ लाख ४० हजार रुपये होते. डॉलर वधारल्याने ते १ लाख ७५ हजारांवर पोहोचले आहे. काही शिक्षणक्रमांसाठी शिष्यवृत्त्या मिळतात, त्यानंतरही विद्यापीठातील वार्षिक शिक्षणखर्च ७० ते ८० लाखांपर्यंत होत आहे.कॅनडा, अमेरीका, इंग्लंडसह काही आशियाई देशांत भारतीय विद्यार्थ्यांची संख्या प्रचंड आहे. त्यांना डॉलरच्या महागाईचा सामना करावा लागत आहे. एप्रिलपूर्वीच्या शैक्षणिक सत्राचे शुल्क ७५ रुपयांना एक डॉलर याप्रमाणे भरले होते, सध्या दुसऱ्या सत्राचे शुल्क ८२ रुपयांनुसार भरावे लागत आहे.युक्रेनमध्ये युद्धस्थिती कायम असली, तरी तिची झळ सीमाभागातच जास्त आहे. त्यामुळे जिल्ह्यातील विद्यार्थी युक्रेनला परतू लागले आहेत. त्यांना अतिरिक्त पैसे मोजून वैद्यकीय शिक्षण घ्यावे लागेल.

घरभाडे, मेस झाली महागयुक्रेनमध्ये युद्ध सुरु झाल्यापासूनच घरांचे भाडे महाग होऊ लागले होते. भारतात परतलेल्या विद्यार्थ्यांना आता परतीचे वेध लागले आहेत, त्यांना सदनिकांच्या वाढलेल्या भाड्याचा सामना करावा लागेल. खाण्यापिण्याचे पदार्थही महाग झाल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.

रुपयाच्या तुलनेत डॉलर असा फुगलाजानेवारी - ७४.५१फेब्रुवारी - ७४.७६मार्च - ७५.७८एप्रिल - ७५.९५मे - ७६.५२जून - ७७.५८जुलै - ७८.९५ऑगस्ट - ७८.९५१ सप्टेंबर - ७९.५५२३ सप्टेंबर - ८१.२५३० सप्टेंबर - ८१.८०ऑक्टोबर - ८२.१७

टॅग्स :SangliसांगलीEducationशिक्षण