शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: अहिल्यादेवींच्या पुतळा जागेवरून सत्ताधारी-विरोधकात जुंपली, उरुण ईश्वरपूर पालिकेत बहुमताने ठराव मंजूर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2026 17:34 IST

सभागृहात काही काळ तणावाचे वातावरण

ईश्वरपूर : उरुण-ईश्वरपूर शहरात उभा करण्यात येणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची जागा निश्चित करण्याच्या विषयावर सत्ताधारी आणि विरोधी सदस्यांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक उडत वादंग माजले. त्यामुळे सभागृहात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. अगोदर शहरातील समिती करा आणि मग जागा निश्चित करा, असा आग्रह विरोधकांनी धरला. मात्र सत्ताधारी गटाने शनी मंदिराजवळील जागा निश्चितीचा ठराव बहुमताने मंजूर करून घेतला.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!पालिकेच्या अण्णासाहेब डांगे सभागृहात शुक्रवारी नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांच्या अध्यक्षतेखाली व उपनगराध्यक्ष खंडेराव जाधव, मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत विशेष सभा झाली. सभेत विषयपत्रिकेवरील उर्वरित १७ विषय सर्वानुमते मंजूर करण्यात आले. त्यामध्ये पार्किंग व्यवस्था, अंबिका उद्यान परिसरातील गाळे लिलाव, क्लब हाऊस भाड्याने देणे, पाणीपुरवठा, विविध विकासकामे अशा विषयांचा समावेश आहे.पुतळा जागेचा विषय ठराव मलगुंडे यांनी वाचून दाखवताच शिंदे गट शिवसेनेच्या आनंदराव पवार यांनी चर्चेपूर्वीच ठराव कसा करता, आम्हाला विचारले का? फक्त पुतळा नको स्मारक करा, त्यासाठी अगोदर नगराध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली शहरातील समिती गठित करा. कोणत्याही एका पक्षाची समिती होऊ देणार नाही. हा शहराचा विषय आहे, अशी प्रश्नांची सरबत्ती करत पुतळ्याला विरोध नाही, तो लोकवर्गणीतून करू त्यासाठी मी १ लाख रुपयांची वर्गणी जाहीर करत असल्याचे स्पष्ट केले.त्यावर मलगुंडे यांनी जागा निश्चितीच्या मुद्द्यावर आपली बाजू लावून धरली. या कामाला नगरपालिकेचे पैसे घेणार नाही. समाजाचा प्रश्न आहे, जागा द्या, असे आवाहन केले. मात्र अगोदर समिती करा हा आग्रह राजवर्धन पाटील, अजित पाटील, सतेज पाटील, अमित ओसवाल, अनिता ओसवाल या विरोधकांनी कायम ठेवला. तर सत्ताधारी गटाच्या संदीप माने, कांचन कोळेकर, शुभांगी शेळके, सुनील मलगुंडे, संग्रामसिंह पाटील, सुहास हांडे, सुभाष सूर्यवंशी यांनी जागा निश्चितीचा ठराव मंजूर करा, अशी मागणी लावून धरली.शेवटी नगराध्यक्षांनी हा ठराव मताला टाकत असल्याचे जाहीर केले. त्याला सत्ताधारी गटाने हात वर करत बहुमताने मंजुरी दिली. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागरी लोककल्याण अभियान, नमो उद्यान अभियान राबविण्याचा निर्णय झाला. योग विद्याधाम वर्गाला मोफत जागा देण्याची अरुणादेवी पाटील यांची मागणी मान्य करण्यात आली.

भटक्या कुत्र्यांसाठी निवारा शेड उभारणारअनिता ओसवाल यांनी शहरातील भटक्या कुत्र्यांनी मांडलेल्या उच्छादाकडे लक्ष वेधत त्यांच्या बंदोबस्ताची मागणी केली. त्यावर भटक्या कुत्र्यांसाठी निवारा शेड बांधण्याला मान्यता देण्यात आली. तसेच त्यांचे निर्बीजीकरण आणि लसीकरण करण्याचेही ठरले. आरोग्य सभापती डॉ. संग्राम पाटील यांनी नगरसेवकांनी आपल्या प्रभागातील अशा भटक्या कुत्र्यांची माहिती द्यावी. त्यावर निश्चित कार्यवाही करण्याची ग्वाही दिली.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli: Dispute over Ahilyadevi statue site; resolution passed in Urun Islampur.

Web Summary : Urun Islampur council witnessed clashes over Ahilyadevi Holkar statue location. Opposition demanded committee formation, but ruling party approved the Shani temple site by majority vote. Stray dog shelter also approved.