शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

सांगली महापालिकेतील सत्ताधारी भाजपमध्ये संघर्षाची ठिणगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2019 23:57 IST

कोअर कमिटीच्या कारभाराबद्दलही अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त होऊ लागली आहे. त्यामुळे आता भाजपचा वरिष्ठ नेत्यांना महापालिकेच्या कारभारात लक्ष घालावे लागेल. अन्यथा वर्षभरात महाआघाडीसारखा भाजपचा बिग बझार झाला तर आश्चर्य वाटू नये.

ठळक मुद्देराजकारण रंगणार । स्थायी समिती सभापती निवडीला नाराजीची किनार

शीतल पाटील ।सांगली : महापालिकेच्या स्थायी समितीसह महिला, बालकल्याण, समाजकल्याण समिती सभापती पदांच्या निवडी शुक्रवारी बिनविरोध पार पडल्या. पण या निवडीतून भाजपअंतर्गत संघर्षाची पहिली ठिणगी पडली आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पार पडलेल्या या निवडीला नाराजीची किनार आहे. त्याचे पडसाद विधानसभा निवडणुकीतही उमटण्याची चिन्हे आहेत.

महापालिकेत पहिल्यांदाच भाजपला पूर्ण बहुमताने सत्ता मिळाली. पहिल्या वर्षभराच्या कारभारात फार मोठी झेप भाजपला घेता आली नाही. अगदी मुख्यमंत्र्यांनी दिलेले शंभर कोटी रुपयेही वर्षभराच्या कालावधित खर्च झालेले नाहीत. यातील कामाच्या निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्या असल्या तरी, प्रत्यक्षात कामाला सुरुवात झालेली नाही. गतिमान आणि पारदर्शी कारभारासाठी कोअर कमिटीची स्थापना करण्यात आली. आता या कोअर कमिटीतील सदस्यांच्या हेतूवरच नगरसेवक संशय घेऊ लागले आहेत.

महापालिकेची अर्थ समिती मानल्या जाणाऱ्या स्थायी समितीसाठी दिग्गज नगरसेवक इच्छुक होते. मिरजेतून गणेश माळी, कुपवाडमधून गजानन मगदूम यांची नावे पहिल्या दिवसापासूनच चर्चेत होती. पहिल्यावर्षी सांगलीला संधी दिल्याने आता सभापतीपद मिरज अथवा कुपवाडला दिले जाणार, हे स्पष्ट होते. माळी व मगदूम यापैकी कोण? अशी चर्चा सुरू असतानाच शेवटच्याक्षणी संदीप आवटी यांनी बाजी मारली. त्यामुळे माळी आणि मगदूम हे दोघेही नाराज झाले. स्थायी सदस्य निवडीवेळी ही भाजपअंतर्गत नाराजी उफाळून आली होती. मिरजेतून शिवाजी दुर्वे, आनंदा देवमाने हे सदस्यपदासाठी इच्छुक होते. पण या दोघांनाही डावलून मोहना ठाणेदार यांची स्थायी सदस्यपदी वर्णी लागली. त्यानंतर देवमाने यांनी नुकत्याच झालेल्या महासभेत थेट भाजपविरोधात आघाडी उघडली. कुपवाड जागा खरेदी, पथदिव्यांच्या प्रस्तावाला त्यांनी उघडपणे विरोध केला. ‘आमचा बाप कोअर कमिटीत नाही म्हणून आम्हाला पदे मिळत नाहीत’, अशी प्रतिक्रिया एका नगरसेवकाने सभापती निवडीच्या पार्श्वभूमीवर दिली होती.

या प्रतिक्रियेतून नाराजी निर्माण झाल्याचे दिसून येते.समाजकल्याण समितीमध्येही सारे काही आलबेल नाही. स्नेहल सावंत यांनी थेट नगरसेवक पदाच्या राजीनाम्याची धमकी दिल्याची चर्चाही सुरू आहे. त्यातच विधानसभा निवडणुका तोंडावर असल्याने भाजपला सावंत यांची नाराजी न परवडणारी होती. त्यामुळे इतर सदस्यांची नाराजी ओढवून घेत भाजप नेतृत्वाने सावंत यांना सलग पाचव्यांदा सभापतिपदाची संधी दिली.कोअर कमिटीतील नेत्यांच्या मुलांना संधीमहापालिकेच्या सत्तेचा काटेरी मुकुट सांभाळणे राजकीय पक्षांच्या नेत्यांना अडचणीचे ठरले आहे. जयंत पाटील, मदन पाटील त्यांच्या सत्ताकाळातही फाटाफूट झाली होती. आता भाजपच्या सत्ताकाळातही तोच कित्ता गिरवला जातो की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे. भाजपच्या कोअर कमिटीतील सदस्य महापालिकेतील महत्त्वाची पदे वाटून घेत आहेत. सत्तेत आल्यानंतर कोअर कमिटीचे सदस्य माजी आमदार दिनकर पाटील यांचे पुत्र अजिंक्य पाटील यांना स्थायी सभापतीची संधी मिळाली. दिलीप सूर्यवंशी यांचे पुतणे धीरज यांची उपमहापौरपदी वर्णी लागली. आता सुरेश आवटी यांचे पुत्र संदीप यांना स्थायी सभापतिपदाची लॉटरी लागली. त्यामुळे सर्वसामान्य नगरसेवकांना संधी कधी मिळणार, अशी चर्चा अंतर्गत गोटात सुरू आहे.महापालिकेतील भाजपचे नेते पक्षाचे नगरसेवक एकसंध असल्याचा दावा करीत असले तरी, अंतर्गत संघर्षाची ठिणगी पडली आहे. कोअर कमिटीच्या कारभाराबद्दलही अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त होऊ लागली आहे. त्यामुळे आता भाजपचा वरिष्ठ नेत्यांना महापालिकेच्या कारभारात लक्ष घालावे लागेल. अन्यथा वर्षभरात महाआघाडीसारखा भाजपचा बिग बझार झाला तर आश्चर्य वाटू नये.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाBJPभाजपाSangliसांगली