शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीतील कुरळपमध्ये यात्रेच्या मानावरून सत्ताधारी-विरोधकात तणाव, गावात पोलिस बंदोबस्त तैनात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2023 12:56 IST

६ एप्रिलरोजी हनुमान यात्रा होणार

कुरळप : कुरळप (ता. वाळवा) येथील ग्रामदैवत हनुमानाच्या यात्रेत मानपानावरून राज्य साखर संघाचे अध्यक्ष पी. आर. पाटील व ग्रामपंचायतीमधील सत्ताधारी गट आमने-सामने आले. गावात तणाव निर्माण झाल्याने पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.कुरळप येथे ६ एप्रिलरोजी हनुमान यात्रा होणार आहे. तिच्या आयोजनाबाबत बुधवारी हनुमान मंदिरात दोन्ही गटांनी एकाच वेळी बैठक बोलावल्याने तणाव निर्माण झाला. यात्रेचा मान आमचाच आहे, असा आग्रह पी. आर. पाटील यांनी धरला. सत्ताधारी गटाने आपली सत्ता असल्याने यात्रेचा अधिकार आपल्याचाच असल्याचे ठासून सांगितले. त्यामुळे दोन्ही गटात तणाव निर्माण झाला.याबाबत माहिती मिळाल्यावर इस्लामपूर ठाण्याच्या पोलिस उपविभागीय अधिकारी पद्मा कदम यांनी गावात दाखल होत दोन्ही गटांना शांतता राखण्याचे आवाहन केले. अनुचित प्रकार घडल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा दिला.सत्ताधारी गटाने यात्रा कमिटीच्या अध्यक्षपदी अशोक पाटील यांची, तर उपाध्यक्षपदी मारुती जाधव यांची निवड केली. यावेळी सत्ताधारी गटाकडून अशोक पाटील यांच्याहस्ते, तर विरोधी गटाकडून पी. आर. पाटील यांच्या हस्ते वेगवेगळा पूजनाचा विधी झाला.

कारवाई करणारदोन्ही गटांनी गावाची शांतता व सलोखा कायम टिकवण्यासाठी एकत्र येऊन निर्णय घ्यायला हवा होता. चुकीच्या घटना घडल्यास कारवाई केली जाईल, असे कुरळपचे पोलिस उपनिरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी सांगितले.

पी. आर. पाटील यांच्या कार्यकाळातील भ्रष्टाचाराचा लेखाजोखा ग्रामस्थांच्या समोर येत आहे. त्यातून ते आपली प्रतिमा सोज्वळ ठेवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. यात्रेला गालबोट लागल्यास त्याला सर्वस्वी पी. आर. पाटील हे जबाबदार राहतील. - अशोक पाटील, अध्यक्ष, यात्रा कमिटी 

ग्रामदैवतेच्या यात्रेचा मान आमचाच आहे. सत्ताधारी गट एका विजयाने उन्मत झाला आहे. गावामध्ये बाहेरचा भटजी आणून सत्ताधारी गटाने चुकीचा पायंडा पाडला आहे. हनुमानाचे मंदिर कोट्यवधी रूपये खर्च करून आम्हीच बांधले. यामुळे देवळात बसण्याचा नैतिक अधिकार आम्हालाच आहे.- पी. आर. पाटील, अध्यक्ष, राज्य सहकार संघ

टॅग्स :Sangliसांगली