शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी सत्तेसाठी कधीच हापापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
2
बलुचिस्तानात मोठा खेला...! सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग; भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला
3
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
4
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
5
Sita Navami 2025: संततीप्राप्तीसाठी सीता नवमीचे व्रत कसे व कधी करावे ते जाणून घ्या!
6
भयंकर! ४ वर्षे पालकांनी ३ मुलांना घरात ठेवलेलं कोंडून; कारण ऐकून बसेल मोठा धक्का
7
पुत्र जन्मला! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलला, गोंडस लेकाला दिला जन्म
8
पत्नीची हत्या करुन मृतदेह पुरला, तीन दिवसांनी हात बाहेर येताच...; दृष्य पाहून पोलिसही हादरले
9
लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवला; संजय शिरसाट संतापले, म्हणाले, “खाते बंद केले तरी चालेल”
10
"तुम्ही अजित पवारांना भेटल्या, खरं की खोटं... उत्तर द्या?"; सुषमा अंधारे-अंजली दमानिया सोशल मीडियावर भिडल्या
11
“तेव्हा मी केंद्रात होतो, फडणवीस नाही”; जातनिहाय जनगणनेवर पृथ्वीराज चव्हाण स्पष्टच बोलले
12
Tata Motors नं Q4 निकाल आणि डिविडेंडपूर्वी घेतला मोठा निर्णय; ५०० कोटी रुपयांचं आहे प्रकरण
13
"...तर पाकिस्तान हल्ला करेल!"; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Tarot Card: 'पेराल ते उगवेल' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
15
गर्लफ्रेंडसोबत चायनीज खाताना आईने लेकाला रंगेहाथ पकडलं; रस्त्यात चपलेने मारलं, धू-धू धुतलं
16
'या' कंपनीनं लाँच केला १८० दिवसांचा प्लान; SonyLIV सारख्या OTT चं मिळणार सबस्क्रिप्शन, काय आहे खास?
17
Leopard in Marathi: परीकडे बघून राधा अन् समृद्धी हसली; तिघींची गट्टी जमली
18
क्रिकेटवेडी, बोल्ड फोटो अन् शुबमनसोबत रिलेशनशीपची चर्चा; अवनीत कौर नेमकी आहे तरी कोण?
19
IPL 2025: वैभव सूर्यवंशीकडे आहेत 'इतक्या' बॅट; आकडा ऐकून नितीश राणा झाला शॉक, पाहा व्हिडीओ
20
"दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्यांना सोडणार नाही"; पहलगाम हल्ल्यावरुन PM मोदींची मोठी घोषणा

सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी ५४५ कोटींचा आराखडा - पालकमंत्री पाटील 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2025 16:50 IST

सौर ऊर्जेवर सर्वाधिक भर

सांगली : गतवर्षी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक वैशिष्ट्यपूर्ण व महत्त्वपूर्ण कामे हाती घेतली. चालू आर्थिक वर्षात ५४५ कोटी रुपयांची तरतूद केली असून, अनेक नाविन्यपूर्ण योजनांवर तो निधी खर्च करून जिल्ह्याच्या विकासाला गती देणार आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.महाराष्ट्र दिनाच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात पालकमंत्री पाटील बोलत होते. सांगलीतील पोलिस परेड ग्राउंड येथे आयोजित कार्यक्रमास खासदार विशाल पाटील, जिल्हाधिकारी अशोक काकडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, प्रभारी पोलिस अधीक्षक रितू खोखर, महानगरपालिका आयुक्त सत्यम गांधी, डॉ. विजयकुमार शहा आदी उपस्थित होते.चंद्रकांत पाटील म्हणाले, शंभर दिवस कृती आराखडा कार्यक्रमात महसूल विभागाकडून तहसील स्तरावर सातबारा पुस्तके, फेरफार पुस्तके व हक्क नोंद संचिका संकलनाची मोहीम हाती घेतली आहे. यामध्ये पाच हजार ४३५ सात-बाराची पुस्तके, दोन हजार २६८ फेरफार पुस्तके व तीन लाख २२ हजार ७८५ हक्क नोंद संचिका तलाठी कार्यालयातून तहसीलदारांच्या अभिलेखात जमा केल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांना जुने फेरफार व सात-बाराच्या नक्कल तहसील कार्यालयात तत्काळ मिळणार आहेत.गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजनेतून गेल्या आर्थिक वर्षात १७२ शेतकऱ्यांना लाभ दिला आहे. २०२३-२४ खरीप हंगामात प्रधानमंत्री पीक विमा योजनेमधून साडेतीन लाख शेतकऱ्यांना १४१ कोटी ८४ लाख रुपये विमा भरपाई वाटप केले आहे. हवामान आधारीत फळ पीक विमा योजनेमध्ये १० हजार ६८७ शेतकऱ्यांना २९ कोटी ८५ लाख रुपये अनुदान दिले आहे. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेमध्ये २०२४-२५ मध्ये ५६३ प्रकल्पांना मंजुरी मिळाली आहे.

सौर ऊर्जेवर सर्वाधिक भरचंद्रकांत पाटील म्हणाले, मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी योजनेच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये जिल्ह्यात ४६ ठिकाणी एकूण ३१७ मेगावॅट सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारणी प्रगतीपथावर आहे. त्यातील बसर्गी, जिरग्याळ (ता. जत), माडगुळे, लिंगीवरे (ता. आटपाडी) आणि मणेराजुरी (ता. तासगाव) येथील एकूण २७ मेगावॅट क्षमतेचे पाच प्रकल्प सुरू झाले आहेत.

यांचा झाला गौरवराष्ट्रपती पदकाने सन्मानित महापालिकेच्या अग्निशमन विभागाचे फायरमन कासाप्पा माने, केंद्रीय गृह मंत्रालयाकडून गौरवण्यात आलेले महानगरपालिकेचे सुनिल माळी, बाबूराव कोळी आणि राजेंद्र कदम, पोलिस महासंचालक पदकाने सन्मानित सहा पोलीस अंमलदारांचाही सत्कार पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते केला.

लक्षवेधी परेड संचलनपरेड संचलनात पोलिस, पोलिस बँड, श्वान, निर्भया, बीडीडीएस, अग्निशमन, दंगल नियंत्रक पथक आदी पथकांचा समावेश होता.

टॅग्स :Sangliसांगलीguardian ministerपालक मंत्रीchandrakant patilचंद्रकांत पाटील