शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षाचालकांना १५०० रुपये मदतीची प्रक्रिया उद्यापासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 15:47 IST

Traffic, Uddhav Thackeray Sangli: रिक्षाचालकांना दिड हजार रुपयांची मदत देण्याची प्रत्यक्ष प्रक्रिया शनिवारपासून (दि.२२) सुरु होत आहे. परिवहन आयुक्तांनी ही माहिती रिक्षा संघटनांना दिली.

ठळक मुद्देरिक्षाचालकांना १५०० रुपये मदतीची प्रक्रिया उद्यापासूनया प्रक्रियेची ऑनलाईन चाचणी होणार

सांगली : रिक्षाचालकांना दिड हजार रुपयांची मदत देण्याची प्रत्यक्ष प्रक्रिया शनिवारपासून (दि.२२) सुरु होत आहे. परिवहन आयुक्तांनी ही माहिती रिक्षा संघटनांना दिली.लॉकडाऊनमध्ये चरितार्थाचा प्रश्न निर्माण झालेल्या रिक्षाचालकांसाठी शासनातर्फे अनुदान देण्यात येणार आहे. राज्यभरातील रिक्षा चालकांच्या बँक खात्यात पैसे वर्ग केले जातील. त्यासाठी संगणकीय यंत्रणा तयार करण्याचे काम पूर्ण झाले आहे. रिक्षाचालकाचा परवाना क्रमांक, रिक्षा क्रमांक व आधार क्रमांक ही माहिती या यंत्रणेत अपलोड करण्यात आली आहे.

अनुदानासाठी रिक्षा चालकांनी या यंत्रणेवर आपला आधार, परवाना व वाहन क्रमांक भरायचा आहे. संगणकीय यंत्रणा तिची पडताळणी करेल. शासनाने भरलेल्या माहितीशी रिक्षाचालकाने भरलेली माहिती जुळली की तो अनुदानासाठी पात्र होईल. त्याच्या आधार क्रमांकाशी लिंक असलेल्या बँक खात्यावर पैसे जमा होतील.

या व्यतिरिक्त अन्य कोणतीही कागदपत्रे जमा करायची नाहीत. शनिवारपासून रिक्षा चालकांना माहिती भरता येईल. या प्रक्रियेची ऑनलाईन चाचणी शुक्रवारी (दि.२१) होणार असल्याची माहिती सांगली जिल्हा रिक्षा संघटनेचे अध्यक्ष महेश चौगुले यांनी दिली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याTrafficवाहतूक कोंडीUddhav Thackerayउद्धव ठाकरेSangliसांगली