शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
3
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
4
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
5
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
6
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
7
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
8
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
9
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
10
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
11
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
12
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
13
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
14
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
15
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
16
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
17
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
18
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
19
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
20
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ

प्रेमदिनी सोन्याच्या पाण्यात न्हाले गुलाब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 22:58 IST

सांगली : सोने-चांदी, हिरे-मोती यापेक्षाही हृदयात धडधडणाºया खºया प्रेमाची किंमत कितीतरी पटीने अधिक व अनमोल मानली जाते, मात्र हेच अनमोल प्रेम व्यक्त करण्यासाठी सोन्यासारख्या मौल्यवान गोष्टींचा मुलामा आता लावला जात आहे. सांगली त २४ कॅरेट सोन्याच्या पाण्यात न्हालेले गुलाबपुष्प भेट देऊन व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यात आला.फुलांप्रमाणे बहरलेली मने... गुलाब, विविध ...

सांगली : सोने-चांदी, हिरे-मोती यापेक्षाही हृदयात धडधडणाºया खºया प्रेमाची किंमत कितीतरी पटीने अधिक व अनमोल मानली जाते, मात्र हेच अनमोल प्रेम व्यक्त करण्यासाठी सोन्यासारख्या मौल्यवान गोष्टींचा मुलामा आता लावला जात आहे. सांगलीत २४ कॅरेट सोन्याच्या पाण्यात न्हालेले गुलाबपुष्प भेट देऊन व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यात आला.फुलांप्रमाणे बहरलेली मने... गुलाब, विविध प्रकारच्या सुंदर भेटवस्तू, भेटकार्ड यांच्या माध्यमातून व्यक्त होणारे प्रेम... भेटीगाठींचे कार्यक्रम अशा वातावरणात सांगलीत बुधवारी व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यात आला. एकीकडे प्रेमाचा हा बहर फुलत असताना २५ ते ३० टक्के व्यापारात घट झाल्याने भेटवस्तू व पुष्पविक्रेत्यांची मने थोडी कोमेजल्याचे चित्र दिसत होते. तरीही गेल्या दोन दिवसांपासून थंड असलेल्या फुलांच्या बाजारात अचानक हालचाल झाली आणि फुलांना मागणी वाढली. त्यामुळे विके्रत्यांना थोडा दिलासाही मिळाला.व्हॅलेंटाईन डेचा सर्वाधिक उत्साह महाविद्यालयीन तरुणाईबरोबरच विवाहित जोडप्यांमध्येही मोठ्या प्रमाणावर दिसून आला. गुलाबाच्या फुलांना, पुष्पगुच्छला सर्वाधिक मागणी होती. सोन्याचा मुलामा दिलेल्या गुलाब फुलांनी सजलेला ८ हजार रुपयांचा गुच्छ बुधवारी सांगलीतून विक्रीला गेला. नैसर्गिकरित्या बहरलेल्या फुलांना हव्या त्या नैसर्गिक रंगात रंगवून प्रेमदिनाच्या आनंदात अधिक रंग भरण्याकडेही प्रेमिकांचा कल होता. त्यामुळे विविध रंगात सजविलेल्या डच गुलाबांनाही मागणी होती. ४० ते ४५ रुपये प्रतिनग याप्रमाणे बुधवारी अशा रंगीत फुलांची विक्री झाली.पारंपरिक पद्धतीने एखादी भेटवस्तू किंवा गुलाबाचे फूल देऊन एकमेकांप्रती प्रेम व्यक्त करतानाच सोशल मीडियावरील प्रेमालाही भरती आली होती. मोबाईलवरून व्हॅलेंटाईन डेच्या ग्रिटिंग्ज, व्हिडिओ, कविता, शेरोशायरी अशाप्रकारच्या माध्यमातून प्रेम व्यक्त करण्यात आले. गेल्या दोन दिवसांपासून ठप्प असलेल्या बाजारपेठेत बुधवारी व्हॅलेंटाईन डेला अचानक हालचाल झाली. भेटवस्तू, फुलांच्या खरेदीसाठी गर्दी दिसत होती. तरीही सरासरी उलाढालीपेक्षा यंदा २५ ते ३० टक्के घट झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.चौकटडच गुलाब हसला, देशी रुसलाव्हॅलेंटाईन डेच्या पूर्वसंध्येला दराअभावी रुसलेला डच गुलाब बुधवारी भाव मिळाल्याने फुलला. १५ ते २0 रुपये नगावरून २५ ते ३0 रुपयांपर्यंत त्याला भाव मिळाला. दुसरीकडे देशी गुलाबाकडे प्रेमिकांनी पाठ फिरविल्यामुळे त्याचे दर घसरल्याचे दिसत होते. देशी गुलाब केवळ ७ ते ८ रुपयांना विकला गेला. त्याला मागणीही अत्यंत कमी होती.किमती पुष्पगुच्छ कसे असते?सांगलीत बुधवारी व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने अनेक किंमती पुष्पगुच्छ विकले गेले. त्यांना मागणीही चांगली होती. गुलाबांबरोबरच इटालियन किंवा अन्य परदेशी चॉकलेटसला गुंफून तयार केलेला पुष्पगुच्छही महाग आहे. त्याचबरोबर चॉकलेटस्बरोबर असलेल्या गुलाबांना चोवीस कॅरेट सोन्याचा मुलामा लावलेला असतो. यामध्ये सोन्याचा मुलामा दिलेल्या फुलांच्या संख्येवर त्याची किंमत ठरते.भेटवस्तूंच्या दुकानातही हालचालफुलांबरोबरच भेटवस्तूंच्या दुकानातही बुधवारी हालचाल झाली. खरेदीदारांनी गर्दी केल्यामुळे विक्रेत्यांना दिलासा मिळाला. तरीही फूल व भेटवस्तू विक्रेत्यांच्या मते गेल्या काही वर्षातील सरासरी उलाढालीची तुलना करता २५ ते ३० टक्के घट झाली आहे. यास आॅनलाईन खरेदीकडे वाढलेला कलही कारणीभूत असल्याचे त्यांचे मत आहे.