शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस-राष्टवादीत चार जागांसाठी रस्सीखेच -: विधानसभा निवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 23:36 IST

सांगली जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांपैकी आघाडीच्या २००९ मधील जागा वाटपानुसार राष्टवादीकडे इस्लामपूर, तासगाव-कवठेमहांकाळ व जत, तर काँग्रेसकडे सांगली, मिरज, पलूस-कडेगाव, शिराळा आणि खानापूर मतदारसंघ आहेत.

ठळक मुद्देजत, मिरज, शिराळा, पलूस-कडेगावच्या जागेवरून स्थानिक इच्छुकांमध्ये दावेदारी सुरू

सांगली : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जांच्या प्रक्रियेचा दुसरा टप्पा सुरू असताना, चार जागांसाठी दोन्ही काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. ही मागणी इच्छुक व स्थानिक पदाधिकाऱ्यांतून होत असली तरी, त्याची दखल घेत जागावाटपाच्या बैठकीतही यावरून चर्चा रंगण्याची चिन्हे आहेत. जत, मिरज, पलूस-कडेगाव व शिराळा या चार जागांच्या अदलाबदलीची मागणी जोर धरत आहे.

सांगली जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांपैकी आघाडीच्या २००९ मधील जागा वाटपानुसार राष्टवादीकडे इस्लामपूर, तासगाव-कवठेमहांकाळ व जत, तर काँग्रेसकडे सांगली, मिरज, पलूस-कडेगाव, शिराळा आणि खानापूर मतदारसंघ आहेत. यातील इस्लामपूर, तासगाव-कवठेमहांकाळ, सांगली या तीन मतदारसंघात उमेदवारीसाठी आघाडीत चुरस दिसत नाही. जत आणि मिरज मतदारसंघात दोन्ही पक्षांकडे सर्वाधिक इच्छुकांचे अर्ज दाखल झाले आहेत. तेथे चुरस दिसून येत आहे. राष्टवादीच्या इच्छुकांच्या मुलाखतीवेळी मिरजेतील इच्छुकांनी, काँग्रेसकडील जागा राष्टवादीने घ्यावी, अशी आग्रही मागणी केली. पलूस-कडेगाव मतदारसंघातून राष्टवादीकडे केवळ शरद लाड यांचा एकमेव अर्ज असला तरी, त्यांनीही या जागेची मागणी करीत, किती दिवस दुसऱ्यांसाठीच लढायचे, असा सवाल उपस्थित केला. लाड यांचा मोठा गट आहे. या गटाचाही या जागेसाठी आग्रह सुरू आहे.

जत विधानसभा मतदारसंघ राष्टवादीकडे असला तरी, काँग्रेसचे विक्रम सावंत यांच्यासह अन्य इच्छुकांनी ही जागा काँग्रेसकडे घ्यावी, अशी मागणी केली आहे. या मागणीला जोर येत असतानाच राष्टवादीच्या येथील इच्छुकांनी, ही जागा राष्टवादीने कोणत्याही परिस्थितीत सोडू नये, असे सांगितले आहे. मिरजेच्या जागेसाठीही राष्टवादीने हट्ट धरला आहे. काँग्रेसपेक्षा राष्टवादीकडे अधिक सक्षम उमेदवार असल्याचा दावा त्यांनी केला आहे, मात्र काँग्रेसच्या इच्छुकांनी हा परंपरागत काँग्रेसचा मतदारसंघ सोडू नये, अशी मागणी पक्षाकडे केली आहे. शिराळा मतदारसंघ त्यावेळी काँग्रेसकडे गेला होता, मात्र आता राष्टवादीनेही त्यावर दावा केला आहे.

या जागांसाठी दोन्ही पक्षात जोरदार रस्सीखेच अनुभवास येत आहे. निवडणुका जवळ येतील तशी ही रस्सीखेच अधिकच रंगतदार अवस्थेत येणार आहे. काँग्रेस व राष्टÑवादी आघाडीचा व जागावाटपाचा निर्णय अद्याप झाला नसला तरी, याकडे जिल्ह्यातील सर्व इच्छुकांसह पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.आघाडीचा : समीकरणांवर परिणामवंचित बहुजन आघाडी, स्वाभिमानी शेतकरी संघटना या घटक पक्षांशी आघाडी झाली, तर त्यांनाही यातील काही जागा द्याव्या लागणार असल्याने, पुन्हा गणित बदलणार आहे. जत व मिरज या दोन जागांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आग्रही आहे. या दोनच मतदारसंघात तीन पक्षांची दावेदारी असल्याने, याबाबत निर्णय घेताना पक्षीय नेतृत्वाची कसरत होणार आहे. या दोन्ही पक्षांशी आघाडी झाली नाही तरीही रस्सीखेच थांबणार नाही.नाराजीची भीतीजागा बदल झाले तरीही नाराजी आणि झाले नाही तरीही नाराजीचा सामना दोन्ही पक्षांना आणि पर्यायाने आघाडीला करावा लागणार आहे. जत आणि मिरज या मतदारसंघात सर्वाधिक नाराजीचा सामना दोन्ही पक्षांना करावा लागण्याची शक्यता आहे.

टॅग्स :SangliसांगलीElectionनिवडणूकvidhan sabhaविधानसभा