शहरं
Join us  
Trending Stories
1
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
2
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
3
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
4
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
5
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
6
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
7
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
8
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
9
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
10
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
11
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
12
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
13
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
14
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
15
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
16
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
17
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
18
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
19
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
20
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला

कुंभारी येथे तीन घरांवर दरोडा, चार लाख ३५ हजाराचा मुद्देमाल रोख रकमेसह लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 14:09 IST

जत : कुंभारी (ता. जत) येथील नानासाहेब तुकाराम जाधव (वय ४०) यांच्यासह इतर दोन घरांवर चोरट्यांनी दरोडा टाकून चार ...

ठळक मुद्देकुंभारी येथे तीन घरांवर दरोडाचार लाख ३५ हजाराचा मुद्देमाल रोख रकमेसह लंपास

जत : कुंभारी (ता. जत) येथील नानासाहेब तुकाराम जाधव (वय ४०) यांच्यासह इतर दोन घरांवर चोरट्यांनी दरोडा टाकून चार लाख ३५ हजाराचा मुद्देमाल रोख रकमेसह लंपास केला. ही घटना शनिवारी रात्री घडली. याप्रकरणी नानासाहेब जाधव यांनी जत पोलिसांत फिर्याद दाखल केली. एका रात्रीत तीन ठिकाणी घरफोडी झाल्यामुळे कुंभारी गावात व परिसरातील नागरिकांत भीतीचे वातावरण आहे.कुंभारी ते बागेवाडी रस्त्यावर कुंभारीपासून सुमारे अर्धा किलोमीटर अंतरावर नानासाहेब तुकाराम जाधव यांचे धाब्याचे घर आहे. येथे ते आई, पत्नी, दोन मुली व मुलगा यांच्यासमवेत राहतात. शनिवारी रात्रीच्या जेवणानंतर घराच्या मुख्य दरवाजाला कडी घालून सर्व कुटुंबीय अंगणात झोपले होते.

चोरट्यांनी मध्यरात्रीच्यादरम्यान घराची कडी काढून घरातील खुंटीला लावलेली चावी घेऊन कपाटातील रोख २२ हजार आठशे रुपये, सोन्याच्या बांगड्या, पाटल्या, गंठण, अंगठ्या, रिंगा, नाकातील खडा, नथ व चांदीचे ताट, तांब्या, गणेश मूर्ती असा पाचशे ग्राम मुद्देमाल लंपास केला.नानासाहेब जाधव यांना पहाटे जाग आल्यानंतर ही घटना त्यांच्या लक्षात आली. त्यानंतर त्यांनी चोरीसंदर्भात पोलिसांना माहिती दिली.चोरटे दुचाकी किंवा चारचाकी वाहनातून येऊन मुख्य रस्त्यावर वाहन लावून तेथून चोरी करून ते पसार झाले असावेत, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. चोरट्यांनी हाताळलेल्या वस्तूचे ठसे ठसे तज्ज्ञांनी घेतले. या घरफोडीचा तपास करण्यासाठी स्वतंत्र पथक तयार करण्यात आले आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड यांनी दिली.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रणजित गुंडरे करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSangliसांगली