प्रमोद सुकरे
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आणखी एका नवीन नर वाघाची नोंद नुकतीच झाली आहे.या नवीन वाघाला एस टी आर टी ९ असे सांकेतिक नंबर देण्यात आला आहे.तर आता व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या ७ झाली आहे.
खरंतर नवीन वाघ हा चांदोली राष्ट्रीय उद्यानात गेले २ महिने झाले विविध कॅमेरा ट्रॅप मध्ये दिसून आला आहे.त्याचे विविध फोटो व व्हिडिओ कॅमेरा मध्ये आले आहेत. सध्या हा टी ९ वाघ तारा टि ५ च्या ट्रेटरी मध्ये तिच्या मागे फिरताना दिसत आहे.स्थानिक गाईड मंडळी यांनी त्याचे नामकरण 'शिलेदार'असे केले आहे.
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या वाढवण्यासाठी वन्यजीव विभागाकडून अनेक वर्षापासून प्रयत्न सुरू आहेत. काही महिन्यापूर्वीच चंदा व तारा हे २ वाघ स्थलांतरित करून या प्रकल्पात सोडण्याचा आले आहेत. त्यातच आणखी एका वाघाची म्हणजेच या शिलेदार ची भर पडल्याने पर्यावरण प्रेमींच्यातून समाधान व्यक्त केले जात आहे.
आता सह्याद्रीमध्ये वाघांची संख्या ७ झाली
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात या नव्या नळ वाघाची नोंद झाल्याने प्रकल्पातील एकूण वाघांची संख्या ७ वर पोहोचली आहे.टि१ सेनापती,टि२ सुभेदार,टि३ बाजी,टि४ चंदा,टि५ तारा ,टि ६ हिरकणी,टि९ शिलेदार
सध्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील टि ५ (तारा) ह्या वाघिणीच्या क्षेत्रात तीन नर वाघ टि१ सेनापती , टि २ सुभेदार, व नव्याने आलेला टि ९ शिलेदार हे तीन वाघ फिरत आहेत. आता तारा कोणाला निवडते हे पाहावे लागेल- तुषार चव्हाण, क्षेत्र संचालक सह्याद्री व्याघ्र प्रकल्प
ही सह्याद्री व्याघ्र प्रकल्पासाठी अत्यंत आनंदाची बातमी असून ह्या मुळे सह्याद्री मधील असलेली जैवविविधता अधोरेखीत होते. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प ला जोडणाऱ्या राधानगरी तसेच तिलारी दोडामार्ग येथील जंगल क्षेत्र कॉरिडॉर ह्यामध्ये अत्यंत महत्वाची भूमिका वाघांच्या प्रजनन साठी पार पाडीत आहेत- रोहन भाटे (मानद वन्यजीव रक्षक)
सह्याद्री कोकण टायगर एसकेटी २१ या वाघाचे पहिल्यांदा छायाचित्र डिसेंबर २०२४ मध्ये सावंतवाडी वन विभागाच्या कॅमेरा ट्रॅप ला काढण्यात आले. त्याने एका गुराची शिकार केली होती. त्यानंतर तो दाजीपूरमध्ये जानेवारी २०२५ मध्ये कॅमेरा ट्रॅपमध्ये छायाचित्रित झाला. यावरून तो टायगर कॉरिडॉरमधून उत्तरेकडे गेला हे दिसून आले. आता तो जानेवारी आणि फेब्रुवारी २०२६ मध्ये:एसटिआर मध्ये रेकॉर्ड झाला. हा एक तरुण नर वाघ आहे आणि योग्य प्रदेश शोधण्यासाठी स्थलांतर करत आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाकडे जाणारा कॉरिडॉर वाघ संरक्षणासाठी किती महत्त्वाचा आहे हे त्याने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे- गिरीश पंजाबी, वन्यजीव जीवशास्त्रज्ञ
Web Summary : Sahyadri Tiger Reserve welcomes a new male tiger, named 'Shiledar,' raising the tiger population to seven. This addition, along with previous translocations, highlights successful conservation efforts and the importance of wildlife corridors for tiger breeding.
Web Summary : सह्याद्री टाइगर रिजर्व में 'शिलेदार' नामक एक नया नर बाघ आया है, जिससे बाघों की संख्या बढ़कर सात हो गई है। यह वृद्धि, पिछली पुनर्स्थापनाओं के साथ, सफल संरक्षण प्रयासों और बाघ प्रजनन के लिए वन्यजीव गलियारों के महत्व को दर्शाती है।