शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

लय भारी। सांगलीच्या हळदीला देशभरातून मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2019 04:11 IST

हळदीसाठी प्रसिध्द सांगलीच्या बाजारपेठेत स्थानिकबरोबर आंध्र प्रदेश व कर्नाटकमधून हळदीची आवक वाढत आहे. चांगला दर, पारदर्शी व्यवहार यामुळे सांगलीतील हळदीच्या आवकेत चांगली वाढ होत आहे.

- शरद जाधवसांगली - हळदीसाठी प्रसिध्द सांगलीच्या बाजारपेठेत स्थानिकबरोबर आंध्र प्रदेश व कर्नाटकमधून हळदीची आवक वाढत आहे. चांगला दर, पारदर्शी व्यवहार यामुळे सांगलीतील हळदीच्या आवकेत चांगली वाढ होत आहे. संपूर्ण देशात हळदीसाठी प्रसिध्द असलेल्या आंध्र प्रदेश व तामिळनाडूच्या बाजारपेठांशी स्पर्धा करत सांगलीने उलाढालीत भरारी घेतली आहे. तामिळनाडूत उत्पादन घटल्याने व्यापाऱ्यांनीही सांगलीच्या बाजारपेठेला प्राधान्य दिले आहे.मार्केट यार्डात स्थानिक भागाबरोबरच आंध्र प्रदेश, तामिळनाडू व कर्नाटकमधून वर्षाला सर्वसाधारणपणे १२ ते १४ लाख पोत्यांची हळदीची आवक होत असते. वार्षिक सहाशे कोटींवर उलाढाल असलेल्या या बाजारपेठेत आवक वाढतच आहे. यंदा कर्नाटकातून आवक वाढल्याने हंगामाच्या शेवटापर्यंत यंदाची आवक १६ ते १८ लाख पोत्यांवर जाण्याची शक्यता आहे. इथली हळद गुजरात, राजस्थान व मध्यप्रदेशसह दिल्ली व इतर प्रमुख बाजारपेठेत पाठविली जात आहे.तामिळनाडूतील हळद उत्पादक पट्ट्यात गेल्या तीन वर्षांपासून पावसाचे प्रमाण कमी असल्याने तेथील बाजारपेठेत आवक घटली आहे.दराची अपेक्षासध्या हळदीला प्रती क्ंिवटल सरासरी सात हजारपर्यंत दर मिळत असला तरी उत्पादकांना मात्र त्यात वाढ अपेक्षित आहे. किमान आठ ते दहा हजारापर्यंत दर मिळावा. अशी अपेक्षा आहे. तरीही मालाचा उठाव होत असल्याने व व्यवहारही थांबत नसल्याने दराची अपेक्षा ठेवत आवक वाढविली आहे.सांगली बाजारपेठेत हळदीचे व्यवहार चांगल्या पध्दतीने होत असल्याने निर्धोकपणे शेतकरी येत आहेत. यंदा कर्नाटकात उत्पादन वाढल्याने त्याची आवक वाढली आहे व खरेदीदारही येत असल्याने देशभरात सांगलीतून हळद जात आहे.- गोपाल मर्दा, हळद व्यापारी.

टॅग्स :agricultureशेतीSangliसांगली