शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : वॉशिंग्टन सुंदरनं घेतली इंग्लंडची फिरकी; टीम इंडियासमोर १९३ धावांचे आव्हान
2
दुर्गम जंगलातील खोल गुहेमध्ये २ मुलींसह सापडली रशियन महिला, विठ्ठल मूर्तीची करायची पूजा, तपासामधून धक्कादायक माहिती उघड  
3
Video: बापरे!! पर्यटक समोर असताना चित्ता अचानक माणसांसारखा दोन पायांवर उभा राहिला अन्...
4
लातुरात ड्रग्ज विक्री नेटवर्कचा उलगडा! आणखी तिघांना अटक; चार दिवसांची पाेलिस काेठडी
5
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
6
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
7
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
8
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
9
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
10
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
11
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
12
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
13
भारतीय लष्कराकडून पुन्हा एकदा ड्रोन स्ट्राईक, अनेक अतिरेकी ठार झाल्याचा दावा
14
युनूस सरकार बघ्याच्या भूमिकेत; ढाक्यात हिंदू व्यावसायिकाची निर्घृण हत्या; हल्लेखोर मृतदेहावर नाचले
15
रस्त्याने जात असताना कारवर पडले दगड, भयंकर भूस्खलनातून थोडक्यात बचावले माजी मुख्यमंत्री
16
रिंकू राजगुरूचा सिंपल पण स्टायलिश लूक, फोटो नाही तर कॅप्शनने वेधलं सर्वांच लक्ष
17
प्रियकरासोबत पत्नी वारंवार पळून जायची; घटस्फोट घेतला अन् दुधाने अंघोळ करुन आनंद साजरा केला
18
Video: IAS अधिकाऱ्याची परीक्षा हॉलमध्ये विद्यार्थ्याला मारहाण; कॉपी केल्याचा आरोप
19
IND vs ENG : 'गलीतली साडेसाती' संपली; जैस्वालचा 'यशस्वी' झेल! दुसऱ्यांदा रेड्डीच्या जाळ्यात फसला क्रॉउली (VIDEO)
20
पिवळी साडी... शेत... मादक अदा... पाहा, भारतीय क्रिकेटरच्या बहिणीचे ग्लॅमरस PHOTOS

तरुणांमधील क्रांतीची उर्मी हरविली

By admin | Updated: August 8, 2016 23:39 IST

माधवराव माने : सेवावृत्तीने काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींचीही समाजास गरज

आॅगस्ट क्रांती दिनाच्या निमित्ताने विविध उपक्रम मंगळवारी आयोजित करण्यात आले आहेत. भारतीय स्वातंत्र्य चळवळीत तत्कालीन दक्षिण सातारा जिल्ह्यातील योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्यापासून अनेक क्रांतिकारकांनी उभारलेला लढा संपूर्ण देशभर गाजला आणि नोंदला गेला. अशी परंपरा असलेल्या सांगली जिल्ह्यात आजही स्वातंत्र्य चळवळीचे काही साक्षीदार हयात आहेत. सांगली जिल्हा स्वातंत्र्यसैनिक सन्मान समितीचे अध्यक्ष माधवराव माने हे त्यापैकी एक. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळाचा अनुभव घेत त्यांनी संघर्षमय प्रवास नोंदविला. आॅगस्ट क्रांती दिन साजरा होत असताना समाजातील सध्याचे प्रश्न, लोकप्रतिनिधी, सरकार आणि नवी पिढी याबद्दल त्यांच्याशी साधलेला हा थेट संवाद...प्रश्न : तुमच्या काळात तरुणांमध्ये असलेली स्वातंत्र्याची, क्रांतीची उर्मी नव्या पिढीत हरविली आहे, असे वाटते का?उत्तर : निश्चितच. त्यावेळी तरुणांमध्ये देशप्रेम, समता, बंधुता अशा गोष्टींविषयी जागृती करणारे व सेवाभावी वृत्तीने पिढी घडविणारे लोक होते. आता सेवावृत्तीने काम करणारे लोक दिसत नाहीत. त्यातच तरुणांना तशाप्रकारची ऊर्जा देण्याचे कामही होत नाही. त्यामुळेच क्रांतीसाठीची त्यावेळची उर्मी आता नव्या पिढीत दिसत नाही. यात तरुणांचा दोष नाही. त्यांच्यात या गोष्टी रुजविण्यासाठीची यंत्रणाच नाही. सरकारी पातळीवर, विशेषत: शिक्षण व्यवस्थेतून या गोष्टी पाझरत नाहीत. त्यामुळेच सामाजिक प्रश्नावर काहीतरी बदल घडवू पाहण्याची उर्मी आज असायला हवी, ती दिसत नाही. त्यामुळे क्रांतिकारकांचा, देशाचा, समाजाचा इतिहास चांगल्या पद्धतीने या पिढीपर्यंत पोहोचविण्याची गरज आहे. प्रश्न : याचा काही अनुभव तुम्ही घेतला आहे का?उत्तर : मी काही दिवसांपूर्वी एका शाळेत गेलो होतो. त्या शाळेतील मुलांना मी एक प्रश्न विचारला. विश्रामबाग चौकात एका बाजूला उभारलेला पुतळा आपण पाहिला आहे का? त्याच मार्गावरून येणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांनी होकारार्थी मान हलविली. तेथे पुतळा आहे हे त्यांना माहीत होते, मात्र तो कोणाचा आहे?, असा प्रश्न विचारल्यानंतर मात्र एकाही मुलाला त्याचे उत्तर देता आले नाही. मला या गोष्टीचे खूप वाईट वाटले. अर्थात मुलांचा यात दोष नाही. इतिहास आणि त्याअनुषंगाने नोंदल्या जाणाऱ्या गोष्टी यांचा परिचय त्यांना कुणीही करून देत नाही. त्यामुळे शिक्षण व्यवस्थेतच या गोष्टी हव्यात. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिसरकार चळवळीचा डंका देशभर वाजला. ही चळवळ आंतरराष्ट्रीय पातळीवरही चर्चेला गेली. हा इतिहास नव्या पिढीला माहिती नको का? ही अभिमानाची गोष्ट नव्या पिढीने पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविली पाहिजे. प्रश्न : राज्यातील, क्रेंद्रातील कोणतेही सरकार, राजकीय नेते यांची वाटचाल तुम्हाला कशी वाटते?उत्तर : खूप वेदना होतात हे सर्व पाहून. शेतकऱ्यांचे प्रश्न प्रलंबित आहेत. पेन्शनर्स अडचणीत आहेत. कामगारवर्ग तसेच सर्वसामान्य लोकांचे प्रश्न कायम आहेत. शेतकरी आत्महत्या करीत आहेत. स्वातंत्र्यसैनिकांकडे लक्ष दिले जात नाही. त्यांचेही प्रश्न प्रलंबित आहेत. अशा या सर्व प्रश्नांच्या गर्दीत आमदार, खासदारांनी स्वत:च्या मानधन वाढीचा निर्णय घेणे, हे आपल्यासाठी धक्कादायक आहे. लोकप्रतिनिधी सेवक आहेत, हुकूमशहा नव्हेत. समाजाप्रती सेवक म्हणून कार्यरत राहणारे नेते समाजात कुठे आहेत? त्यांना प्रश्नांची खरोखरीच जाण असती, तर त्यांनी स्वत:च्या मानधन वाढीपेक्षा अडचणीतील समाजघटकांचे प्रश्न सोडविण्याची मागणी केली असती. असा प्रयत्न एकानेही केल्याचे दिसून आले नाही. प्रश्न : स्वातंत्र्यसैनिक म्हणून तुम्हाला समाजात कोणत्या गोष्टींची अपेक्षा आहे?उत्तर : समाजातील प्रत्येक घटकाकडे प्रामाणिकपणे लक्ष देणारे व त्यांचे प्रश्न सोडविणारे सरकार हवे. शिक्षण पद्धतीत सुधारणा आवश्यक आहे. इतिहास पोहोचविताना देशप्रेम, सामाजिक भान, त्यासाठीच्या योगदानाची मानसिकता निर्माण करणारी शिक्षणपद्धती हवी. या सर्व गोष्टी घडाव्यात म्हणून सेवक म्हणून कार्यरत राहण्याची तयारी असलेले लोकप्रतिनिधी तयार झाले पाहिजेत. लोकांनी अशाच प्रतिनिधींना पाठबळ दिले पाहिजे. - अविनाश कोळी, सांगली