शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
2
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
3
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO
4
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
5
मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक
6
असंवेदनशिल कृषीमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या; विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी
7
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
8
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...
9
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
10
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?
11
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टिकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
12
भारतातील हे पर्यटन स्थळ बनतंय बँकॉक, वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींना आणलं जातंय, भाजपाच्या महिला नेत्याचा आरोप
13
Madha Crime: चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह
14
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
15
मराठमोळी मृणाल ठाकूर घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात? "सीतारामम" चित्रपटात एकत्र केलंं काम
16
चातुर्मासातील पहिली कामिका एकादशी: श्रीविष्णूंचे ‘या’ स्वरुपात करा पूजन; पाहा, सोपा व्रतविधी
17
“शिवसेना-ठाकरे ब्रँड तुमचे राहिलेले नाही, काँग्रेस बरोबर गेलात तेव्हाच संपला”; भाजपाची टीका
18
कुत्रा चावलाच नाही, तरीही अख्ख्या गावाने घेतले रेबीजचे इंजेक्शन, छत्रपती संभाजीनगरमधील प्रकार
19
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
20
MRI मशीनने व्यक्तीला एका झटक्यात गिळले, तडफडून मृत्यू, एक छोटीशी चूक ठरली जीवघेणी  

एरंडोली, मालगावात काँग्रेसविरोधात बंड

By admin | Updated: February 13, 2017 23:39 IST

मिरज तालुक्यातील स्थिती : बेडग, कवठेपिरान गण बिनविरोध; जिल्हा परिषदेसाठी ४१, तर पंचायत समितीसाठी ५८ उमेदवार रिंगणात

मिरज : उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी सोमवारी मिरज तालुक्यातील १८ पंचायत समित्यांसाठी ५८, तर ११ जिल्हा परिषदेसाठी ४१ उमेदवार उरले आहेत. जिल्हा परिषदेसाठी ५५, तर पंचायत समितीसाठी ७१ उमेदवारांनी माघार घेतली. बेडग गणात भाजप व कवठेपिरान गणात काँग्रेस उमेदवाराची बिनविरोध निवड झाली. मिरज पूर्व भागात मालगाव, एरंडोली जिल्हा परिषद मतदार संघात बंडखोरी झाली आहे. अन्यत्र दुरंगी व तिरंगी लढती होणार आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी तहसील कार्यालयात गर्दी झाली होती. बेडग येथे नऊ उमेदवारांनी माघार घेतल्याने भाजपच्या गीतांजली विष्णू कणसे व कवठेपिरान येथे तीन उमेदवारांनी माघार घेतल्याने काँग्रेसचे अनिल आमटवणे यांची बिनविरोध निवड झाली. तालुक्यातील मालगाव एरंडोली जिल्हा परिषद व पंचायत समितीत काँग्रेसविरोधात बंडखोरी झाल्याने येथे तिरंगी लढत होणार आहे. बेडग, भोसे, म्हैसाळ, आरग जिल्हा परिषद मतदार संघात दुरंगी लढत होत आहे. समडोळी व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आघाडीविरूध्द राष्ट्रवादी काँग्रेस, अशी दुरंगी लढत आहे. कसबे डिग्रज जिल्हा परिषदेसाठी काँग्रेस विरूध्द राष्ट्रवादी, बुधगाव जिल्हा परिषदेसाठी भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, कवलापूर जिल्हा परिषदेसाठी काँग्रेस, भाजप व शिवसेना यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. जिल्हा परिषदेप्रमाणेच पंचायत समितीसाठी दुरंगी व तिरंगी लढती होणार आहेत. आरग जिल्हा परिषद व पंचायत समितीत भाजप उमेदवाराविरूध्द काँग्रेस, राष्ट्रवादी, शेतकरी संघटना, घोरपडे यांची विकास आघाडी एकत्र आली आहे. कवठेपिरान मतदार संघात स्वाभिमानी संघटनेचे पिराजी माळी, राष्ट्रवादीचे इकबाल तांबोळी, अरविंद सपकाळ यांनी माघार घेतल्याने, काँग्रेसचे अनिल आमटवणे यांची बिनविरोध निवड झाली. आमटवणे यांची बिनविरोध निवड जाहीर झाल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी व त्यांच्या समर्थकांनी सोमवारी मिरजेत जल्लोष केला. सर्वांनी सहकार्याच्या भूमिकेतून निवडणुकीत माघार घेऊन मला बिनविरोध निवडून दिले आहे, अशी भावना आमटवणे यांनी यावेळी व्यक्त केली. बेडग मतदार संघात दीपिका जितेंद्र ओमासे, आक्काताई ओमासे, अपक्ष अर्चना नलवडे, शोभाराणी निकम, ज्योती पाटील, रोहिणी पाटील, मंगल भोसले, मंगल माने, जयश्री शिंदे या नऊ उमेदवारांनी माघार घेतल्याने भाजपच्या गीतांजली विष्णू कणसे यांची बिनविरोध निवड झाली. (वार्ताहर)भाजपविरोधात धनंजय मुंडेंच्या मेहुण्याच्या पत्नीची माघारबेडग पंचायत समितीत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचे मेहुणे व प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब ऊर्फ जितेंद्र ओमासे यांच्या पत्नी दीपिका ओमासे यांना राष्ट्रवादीची उमेदवारी देण्यात आली होती. मात्र सोमवारी दीपिका ओमासे यांनी अचानक माघार घेऊन राष्ट्रवादीला धक्का दिला. सर्वसाधारण विरूध्द ओबीसी असा संघर्ष टाळण्यासाठी व गरीब सामान्य उमेदवाराला संधी मिळावी या हेतूने माघार घेतली असल्याचे ओमासे यांनी सांगितले. ते म्हणाले, मी उमेदवारी मागे घेण्याशी धनंजय मुंडे यांचा कोणताही संबंध नाही. जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली मी काम करतो. उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय माझा वैयक्तिक आहे. त्याचा पक्षाशी कोणताही संबंध नाही. बेडगमध्ये मराठा विरूध्द वंजारी असा पारंपरिक संघर्ष आहे. सर्वसाधारण महिला आरक्षण असलेल्या बेडग गणात दीपिका ओमासे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मराठा विरूध्द वंजारी असा संघर्ष टाळण्यासाठी त्यांनी माघार घेतल्याची चर्चा होती. भाजपने खाते उघडलेबेडग येथे भाजपच्या गीतांजली कणसे यांची बिनविरोध निवड झाली आहे. कणसे यांच्याविरोधात राष्ट्रवादीसह नऊ उमेदवारांनी माघार घेतली. गीतांजली कणसे यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर मिरजेत आ. सुरेश खाडे यांच्या कार्यालयासमोर भाजप कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करीत जल्लोष केला. आ. खाडे यांनी कणसे यांचा सत्कार केला. बामणोली, बुधगावसाठी १५ रोजी माघारबामणोली व बुधगाव पंचायत समितीसाठी उमेदवारी अर्ज छाननी प्रक्रियेस आक्षेप घेऊन काही उमेदवारांनी न्यायालयात धाव घेतली आहे. जिल्हा न्यायालयाने सोमवारी त्यांचा आक्षेप फेटाळून लावला. मात्र या दोन गणांसाठी दि. १५ रोजी माघार अर्ज स्वीकारून त्या दिवशी उमेदवारांची अंतिम यादी तयार होणार आहे.खुळे यांना घोरपडे गट, राष्ट्रवादीचे पाठबळएरंडोली जि. प. मतदार संघात काँग्रेसच्या जयश्री पाटील यांच्याविरोधात संगीता खुळे यांनी बंडखोरी केली आहे. खुळे यांना राष्ट्रवादी व घोरपडे गटाने पाठिंबा दिला आहे. एरंडोली पंचायत समिती मतदार संघात काँग्रेसच्या माधवी मलमे यांच्याविरोधात घोरपडे समर्थक शालन भोई यांनी बंड केले आहे. सलगरे पंचायत समितीत काँग्रेसच्या कोरे यांच्याविरोधात साबळे यांनी बंडखोरी केली आहे. मालगावात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार शिवाजी माळी यांच्याविरोधात काँग्रेसचे कपिल कबाडगे यांनी बंड केले आहे. मालगाव पंचायत समितीत आघाडीच्या रूपाली दंडवडे यांच्याविरोधात अनिता क्षीरसागर व गुंडेवाडी गणात काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीचे आप्पासाहेब हुळ्ळे यांच्याविरोधात काँग्रेसचे समर कागवाडे यांनी बंडखोरी केली आहे.