शहरं
Join us  
Trending Stories
1
लालबागच्या राजाचं विसर्जन खोळंबलं, मूर्ती तराफ्यावर चढवताना आलं असं विघ्न, गिरगाव चौपाटीवर काय घडतंय?
2
अमोल मिटकरींचा यू-टर्न! ते ट्विट मागे घेतले, दिलगिरी व्यक्त केली; नेमकं प्रकरण काय?
3
धार्मिक विधीसाठी ठेवलेला १ कोटींचा सोन्याचा मंगल कलश चोरला! आधी धोती घालून रेकी, नंतर साधला डाव
4
पोस्ट ऑफिसच्या PPF योजनेत दरवर्षी ₹५०,००० जमा केल्यास मॅच्युरिटीवर किती पैसे मिळतील?
5
वय हरलं अन् स्वप्नं जिंकली! ३ गिर्यारोहकांचा अनोखा आदर्श, एव्हरेस्टवर फडकावला तिरंगा
6
लालबागचा राजाच्या विसर्जन मिरवणुकीत दिसला जान्हवीचा बॉयफ्रेंड, गुलालाने माखला शिखर पहारीयाचा चेहरा, म्हणतो...
7
साप्ताहिक राशीभविष्य: पितृपक्ष सुरुवात ७ राशींना तापदायी-संमिश्र; ५ राशींना लाभ-पैसा येईल!
8
उपराष्ट्रपती निवडणुकीपूर्वी एनडीए खासदारांची डिनर पार्टी रद्द; पंतप्रधानांच्या निवासस्थानी कार्यक्रम होणार होता; कारण आले समोर
9
एकाच पत्नीचे १५ पती! इंग्लंडला पाठवण्यासाठी लढवली शक्कल, ऐकून पोलिसही थक्क झाले
10
"नातवासाठी घेतलेल्या नवीन TESLA खेळण्याची किंमत किती आहे काका?", मराठी अभिनेत्याचा प्रताप सरनाईकांना टोला
11
Punjab Flood : आभाळ फाटलं, पुराचा वेढा! पंतप्रधान मोदी करणार पंजाबचा दौरा; २००० गावं पाण्याखाली, ४६ मृत्यू
12
अरेरे! लायब्ररी, जमीन विकून बायकोला शिकवलं; पोलिसात नोकरी मिळताच 'तिने' नवऱ्याला सोडलं
13
"घरच्यांनी लग्नासाठी नकार दिला असता तर आम्ही...", प्रिया आणि उमेशने केला मोठा खुलासा
14
आरोग्य आणि जीवन विमा आता जीएसटी-मुक्त! पण प्रत्यक्षात किती प्रीमियम स्वस्त होईल?
15
जीएसटी कपातीनंतरही किंमत कमी केली नसेल तर मला सांगा, मी तिथे येईन; निर्मला सीतारामन यांचे विधान
16
गणेश विसर्जनावेळी वीजेचा शॉक लागून दुर्घटना; एकाचा मृत्यू, चौघे जखमी, मुंबईतील घटना
17
पंतप्रधानांच्या मणिपूर दौऱ्यासाठी जय्यत तयारी; १५००० लोकांची बैठक व्यवस्था, स्टेज उभारणीचे काम सुरू
18
३० वर्षीय विवाहितेचे १७ वर्षांच्या तरुणाशी संबंध, मुलीने आक्षेपार्ह स्थितीत पाहिल्यावर...
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या सकारात्मक भूमिकेचे मोदींकडून स्वागत; म्हणाले, "भारत आणि अमेरिकेमध्ये..."
20
२२ तास चाललेल्या मिरवणुकीनंतर लालबागचा राजा विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर दाखल

गरजेइतके पाणी मिळाल्याने ताकारी योजना पूर्ववत

By admin | Updated: April 20, 2016 00:32 IST

अडविलेले पाणी सोडले : टेंभू योजनेच्या अधिकाऱ्यांकडून योजनेच्या प्रश्नाबाबत उडवाउडवीची उत्तरे--लोकमतचा दणका

कडेगाव : ताकारी योजनेच्या साटपेवाडी बंधाऱ्यात गरजेइतकी पाणी पातळी मिळाल्याने मंगळवारी ही योजना पूर्ववत सुरू झाली. टेंभू योजनेच्या टेंभू (ता. कऱ्हाड) येथील बंधाऱ्यात पाणी अडविल्यामुळे ताकारी योजनेच्या साटपेवाडी बंधाऱ्यातील पाणीपातळी खालावली होती. त्यामुळे ताकारी योजना बंद पडली होती. याबाबत टेंभू योजनेच्या अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. परंतु टेंभूच्या बंधाऱ्यातून पुढे पाणी सोडले. त्यामुळे सकाळी योजनेचे दहा पंप सुरू झाले.टेंभू योजनेच्या अधिकाऱ्यांच्या गैरव्यवस्थापनामुळे तसेच बेजबाबदार कामामुळे सलग तीन आवर्तनात ही ताकारी योजना बंद पडली. सांगली पाटबंधारे विभागाकडे ताकारी, टेंभू योजनेसह नदीवरील सिंचन व्यवस्थापनाची सर्वस्वी जबाबदारी आहे. या विभागाचे कार्यकारी अभियंता ना. नु. सूर्यवंशी यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांच्या सूचनांप्रमाणे ताकारी तसेच टेंभू योजनेच्या अधिकाऱ्यांनी कार्यवाही करणे अपेक्षित असताना, टेंभू योजनेचे संबंधित अधिकारी बेजबाबदारपणे काम करीत गरजेपेक्षा जादा पाणी अडवून ठेवतात. त्यामुळे ताकारी योजना तीनवेळा बंद पडली. याबाबतचे वृत्त मंगळवारी ‘लोकमत’ने प्रसिध्द केले आणि टेंभूचे अधिकारी खडबडून जागे झाले. अडवून ठेवलेले पाणी पुढे सोडले. त्यामुळे ताकारी योजनेसाठी आवश्यक असणारी ५४० ते ५४१ मीटर इतकी पाणी पातळी मिळाली. त्यानंतर ताकारी योजनेचे १० पंप मंगळवारी सकाळी सुरू झाले. ताकारी योजनेचे आवर्तन सुरू होऊ महिना झाला होता. योजनेचे पाणी १०० किलोमीटरवर तासगाव तालुक्यात विसापूरजवळ गेले होते. आता कोरडा पडलेला मुख्य कालवा भरून १०० किलोमीटरपर्यंत पाणी जाण्यास दोन दिवस लागतील. या दोन दिवसातील पाण्याचा अपव्यय अणि वीज बिलाचा भुर्दंड ताकारी योजनेच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनाच सोसावा लागणार आहे. (वार्ताहर)६० लाखाचा भुर्दंडटेंभू बंधाऱ्यात पाणी अडविल्यामुळे ताकारी योजना बंद, असे प्रकार आजपर्यंत तीनवेळा घडले. बंद झालेली योजना सुरू करून पुन्हा पाणी तासगाव तालुक्यात पोहोचण्यासाठी दोन दिवस लागतात. या दोन दिवसात अंदाजे २० लाख रुपये वीज बिल येते. अशाप्रकारे तीनवेळा ताकारी योजना बंद झाली. याचा ६० लाख रूपये भुर्दंड ताकारी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनाच सोसावा लागणार आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांच्या गैरव्यवस्थापनेचा झटका शेतकऱ्यांना बसत आहे.चौकशी गरजेचीटेंभू बंधाऱ्यात पाणी अडवल्यामुळे ताकारी योजना बंद पडल्याबाबतचे वृत्त मंगळवारी ‘लोकमत’ने प्रसिध्द केल्यामुळे संबंधित अधिकारी खडबडून जागे झाले आणि अडवलेले पाणी सोडले. कोयनेतून पाणी कमी सोडल्यामुळे टेंभू बंधाऱ्यात पाणी अडवले होते, अशी उडवाउडवीची उत्तरे संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. परंतु प्रत्यक्षात वस्तुस्थिती काय होती, याची चौकशी होणे गरजेचे आहे.