शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकारी कार्यालयात महसूलविषयक पुस्तकांचा खजिना एकाच ठिकाणी मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2019 00:36 IST

जिल्हा प्रशासनाची बहुतांश सूत्रे याच विभागाकडे असतात. केवळ प्रशासनच नव्हे, तर जिल्ह्यातील सामान्यांतील सामान्य जनतेचा कधी ना कधी महसूल विभागाशी संपर्क येतच असतो.

ठळक मुद्दे जिल्हाधिकाऱ्यांची संकल्पना

शरद जाधव।सांगली : जमीन महसुलासह अनेक महत्त्वाचे विषय सांभाळणाºया महसूल विभागातील कामकाजात सुसूत्रता यावी व अधिकारी, कर्मचाऱ्यांना त्यातील नियम, कायदे समजावेत, या हेतूूने जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल ग्रंथालय साकारले जात आहे. जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांच्या संकल्पनेतून या ग्रंथालयाची निर्मिती होत असून, महसूलविषयक विविध पुस्तके या ग्रंथालयात असणार आहेत. महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाºयांना कामकाजात या ग्रंथालयाची मोठी मदत होणार आहे.

सर्व शासकीय विभागातील महत्त्वाचा विभाग म्हणून महसूल विभाग समजला जातो. जिल्हा प्रशासनाची बहुतांश सूत्रे याच विभागाकडे असतात. केवळ प्रशासनच नव्हे, तर जिल्ह्यातील सामान्यांतील सामान्य जनतेचा कधी ना कधी महसूल विभागाशी संपर्क येतच असतो. अशा स्थितीत महसूलविषयक कामकाज करताना अनेकदा संदर्भ ग्रंथांची आवश्यकता असते.महसूलविषयक अधिनियम, कायदे, त्यातील तरतुदी, जमीन, हक्कसह इतर अनेक बाबींविषयी काम करताना कायद्याची माहिती अधिकारी व कर्मचाºयांना असणे आवश्यक असते. मात्र, अनेकदा सर्वच पुस्तके अधिकाºयांकडे उपलब्ध नसतात. नेमकी हीच गरज ओळखून जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात असे वेगळे ग्रंथालय उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

यासाठी प्रशासनाच्यावतीने नियोजन करण्यात आले असून, जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व विभागांना पत्रे पाठवून आपल्या विभागासाठी आवश्यक असणाºया पुस्तकांची यादी देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आवश्यक पुस्तकांची यादी देताना त्याचे लेखक, प्रकाशकाचीही माहिती द्यावी, जेणेकरून अचूक पुस्तक उपलब्ध करता येईल, असे सांगण्यात आले आहे.जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुतांश विभागांनी आपल्या विभागाला आवश्यक असलेल्या पुस्तकांची यादी तयार करून सादर केली आहे. लवकरच याचे एकत्रिकरण होऊन पुस्तके मागविण्यात येणार असून, त्यानंतर प्रत्यक्षात आगळेवेगळे ग्रंथालय जिल्हाधिकारी कार्यालयात प्रत्यक्षात सुरु होणार असल्यामुळे प्रशासनाची सोय झाली आहे.ग्रंथालयामुळे अधिकारी, कर्मचाºयांसाठी सोयशासनपातळीवरून अनेकवेळा कायद्यात बदल व सुधारणा होत असतात. अशा स्थितीत नवीन माहितीच्या आधारेच कामकाज करावे लागते. एकाचवेळी सर्व संदर्भग्रंथांची अनुपलब्धता व कामकाजातील अडचणीवरही उपाय मिळणार असल्याने या ग्रंथालयामुळे प्रशासनाची सोय होणार आहे. जिल्हाभरातील सर्व अधिकाºयांपासून कर्मचाºयांनाही याचा उपयोग होणार आहे.

टॅग्स :Sangliसांगलीcollectorजिल्हाधिकारीlibraryवाचनालय