शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

वेतनवाढीच्या फरकासाठी निवृत्त एसटी कर्मचारी आंदोलन करणार, सांगलीत पार पडला मेळावा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 16:58 IST

विभागीय कार्यालयासमोर १८ रोजी धरणे आंदोलन

सांगली : एप्रिल २०१६ नंतर एसटीतून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचा मेळावा एसटी स्टँडच्या मागील कालिका भवन मंदिर येथे मंगळवारी पार पडला. या बैठकीत वेतनवाढ, घरभाड्याची तीन टक्क्यांची रक्कम व त्याच्या फरकेची रक्कम अद्याप मिळालेली नाही. ती मिळण्यासाठी १८ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन एसटीच्या सांगली विभागीय कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा पवित्रा निवृत्त कर्मचाऱ्यांनी घेतला.विलास यादव, विलास चव्हाण, एल. डी. सावंत, मकरंद कुलकर्णी, रवींद्र येळमळी, आर. आर. पाटील आदींनी मेळाव्यात मार्गदर्शन केले. यावेळी ३०० हून अधिक सेवानिवृत्त कर्मचारी उपस्थित होते.एक एप्रिल २०१६ नंतर सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना वेतनवाढ, घरभाड्याची तीन टक्क्यांची रक्कम व त्याचा फरक तसेच एप्रिल २०२० नंतर मूळ वेतनातील वाढ व त्या अनुषंगाने मिळणारे सर्व आर्थिक फायदे अद्याप मिळालेले नाहीत. या कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडे थकीत असलेल्या फरकाच्या रकमेची मागणी करूनही ती अद्याप मिळालेली नाही.त्या मागणीसाठी सेवानिवृत्त कर्मचारी आक्रमक झाले असून मागण्यासंदर्भातील निवेदन जिल्हाधिकारी यांना १८ नोव्हेंबर रोजी देऊन सांगली येथील विभागीय कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. महामंडळाचे मध्यवर्ती कार्यालय व राज्य सरकार जोपर्यंत प्रलंबित मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत आंदोलन करण्याचा निर्णय मेळाव्यादरम्यान घेण्यात आला.कामगार नेते चंद्रकांत सूर्यवंशी, महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे महेश पाटील यांनी करण्यात येणाऱ्या आंदोलनास पाठिंबा देत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पाठीशी असल्याचे आश्वासन दिले. यावेळी सुधीर पाटील, चंद्रकांत सूर्यवंशी, नौशाद वाणकर, पंडित माळी, आनंदराव पवार आदींसह सेवानिवृत्त कर्मचारी उपस्थित होते.