अर्जुन कर्पे कवठेमहांकाळ : पोलिसांच्या बरोबरीने कर्तव्य बजावणाऱ्या राज्यातील गृहरक्षक दलाच्या (होमगार्ड) जवानांना गृहखात्याने कोणतीही पूर्वकल्पना न देता १० जानेवारीपासून सेवेतून मुक्त केले आहे. अतिशय तोकड्या भत्त्यावर काम करणाऱ्या जवानांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे.पोलीस दलाला सहकार्य करण्यासाठी महाराष्ट्र गृहरक्षक दल स्थापन करण्यात आले आहे. दसरा, दिवाळी, गणेशोत्सव, ईद, मोहरम, मोठ्या यात्रा व निवडणुकीत त्यांना काम दिले जात होते. राज्यात ५६ हजार, तर सांगली जिल्ह्यात १२०० जवान कार्यरत आहेत. त्यांना कर्तव्य बजावत असताना प्रतिदिन ६७० रुपये भत्ता दिला जातो. मात्र त्यांना दररोज काम दिले जात नव्हते.जुलै २०१९ मध्ये गृहरक्षक दलाच्या जवानांना वर्षातून १८० दिवस काम देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. त्यानुसार कामाचे नियोजन केले जात होते. प्रत्येक जवानाचे १८० कामाचे दिवस भरतील असे गट तयार केले होते, परंतु १० जानेवारीपासून कोणतीही पूर्वसूचना न देता तडकाफडकी या जवानांना सेवेतून मुक्त करण्यात आले आहे.गृहरक्षक दलाचे जवान खासगी आस्थापना, शेतमजुरी, पहारेकऱ्यांचे काम सांभाळून कर्तव्य पार पाडत असतात. वर्षभर काम मिळेल व भविष्यात पगार वाढेल, या आशेवर ते होते. मात्र एका फटक्यात त्यांना सेवामुक्त करण्यात आले आहे. त्यांना त्वरित कामावर हजर करून घ्यावे, कर्तव्य भत्ता प्रतिदिन १००० रुपये करावा व १८० दिवस काम देण्याची दक्षता घ्यावी, अशी मागणी होमगार्ड संघटनेकडून वारंवार होत आहे. तरीही त्यांकडे दुर्लक्ष होत आहे.
राज्यातील गृहरक्षक दलाचे जवान तडकाफडकी सेवामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 13:01 IST
पोलिसांच्या बरोबरीने कर्तव्य बजावणाऱ्या राज्यातील गृहरक्षक दलाच्या (होमगार्ड) जवानांना गृहखात्याने कोणतीही पूर्वकल्पना न देता १० जानेवारीपासून सेवेतून मुक्त केले आहे. अतिशय तोकड्या भत्त्यावर काम करणाऱ्या जवानांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे.
राज्यातील गृहरक्षक दलाचे जवान तडकाफडकी सेवामुक्त
ठळक मुद्देराज्यातील गृहरक्षक दलाचे जवान सेवामुक्तहोमगार्ड संघटनेकडून काम देण्याची मागणी