शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

रिपब्लिकन स्टुडंट युनियनची शासनाकडे मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 13:19 IST

Crime News Education Sector sangli : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या स्वप्नील लोणकरची आत्महत्या अत्यंत वेदनादायी असून अशा आत्महत्या रोखायच्या असतील तर, शासनाने तातडीने रिक्त जागा भराव्यात, अशी मागणी रिपब्लिकन स्टुडंट युनियनच्यावतीने शासनाकडे करण्यात आली आहे.

ठळक मुद्देरिपब्लिकन स्टुडंट युनियनची शासनाकडे मागणीअन्यथा बेरोजगार तरुणांचा उद्रेक, रिपब्लिकन स्टुडंट युनियनने दिला इशारा

सांगली : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या स्वप्नील लोणकरची आत्महत्या अत्यंत वेदनादायी असून अशा आत्महत्या रोखायच्या असतील तर, शासनाने तातडीने रिक्त जागा भराव्यात, अशी मागणी रिपब्लिकन स्टुडंट युनियनच्यावतीने शासनाकडे करण्यात आली आहे.यासंदर्भात संघटनेचे प्रमुख अमोल वेटम यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, नॅशनल क्राईम रेकोर्ड ब्युरोच्या अहवालानुसार देशातील सर्वाधिक विद्यार्थ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्रात होत आहेत. या देशात दर तासाला १ विद्यार्थी तर प्रत्येक दिवसाला २८ विद्यार्थी आत्महत्या करतात. प्रत्येक ७ विद्यार्थ्यांच्या आत्महत्या मागील एक विद्यार्थी हा महाराष्ट्रातील असतो. दरदिवशी या राज्यात ४ विद्यार्थी आत्महत्या करतात.लोणकरची आत्महत्या ही निर्दयी, संवेदनाहीन व्यवस्थेने घडवलेली असून हा मनुष्यवध आहे. यापूर्वी पीएचडी स्कॉलर रोहित वेमुला, डॉ. पायल तडवी यांनी जातीय व्यवस्थेच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली. स्पर्धा परीक्षांच्या युगात विविध क्लासेसची लागलेली चढाओढ, पालकांच्या वाढत्या अपेक्षा, वाढती बेरोजगारी, खासगीकरण, कमी होणाऱ्या नोकऱ्या, स्पर्धा परीक्षा व नोकरीतील भ्रष्टाचार, राजकीय हस्तक्षेप, कुटुंबाचे कर्ज, शैक्षणिक कर्ज, गरीब परिस्थिती, वाढती वयोमर्यादा व मर्यादित परीक्षेसाठी अटेम्प्ट, रखडलेल्या विविध सरकारी तसेच स्पर्धा परीक्षांचे निकाल यामुळे विद्यार्थ्यांवर मानसिक, शाररीक, आर्थिक दडपण येत आहे. शोषण होत आहे.प्रसंगी ते आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत. कोणताही लोकप्रतिनिधी विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर बोलण्यास तयार नाही. शिक्षक तसेच पदवीधर मतदारसंघातील आमदारदेखील राजकीय पक्षाचे बाहुले झाले आहेत. महाआघाडी सरकारने तत्काळ सर्व विभागातील रिक्त जागा भरण्याबाबत निर्णय घ्यावा, अन्यथा बेरोजगार तरुणांचा उद्रेक होईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSangliसांगलीEducation Sectorशिक्षण क्षेत्र