शहरं
Join us  
Trending Stories
1
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
2
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
3
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
4
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
5
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
6
"मी इनसाइडर असते तर बरं झालं असतं", इंडस्ट्रीतील स्ट्रगलवर लोकप्रिय अभिनेत्रीची क्रिप्टिक पोस्ट
7
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
8
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'
9
NSE चा IPO कधी येणार? सेबीचे अध्यक्ष म्हणाले, "आयपीओ आणण्यात कोणताही अडथळा..."
10
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
11
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
12
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
13
८ वर्षांपूर्वी आई गेली, नुकतेच बाबाही गेले; रीमा लागूंच्या वाढदिवसानिमित्त लेकीची भावुक पोस्ट
14
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
15
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
16
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
17
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!
18
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
19
कर्मचाऱ्याला सॅलरीतून मिळाले १४ कोटी तर झाला अवाक्; नंतर जे काही झालं त्याचा विचारही केला नसेल
20
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?

बेरोजगाराच्या सेवा सोसायट्यांसाठी कामे कळवा : एस. के. माळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2019 13:30 IST

शासनाच्या सर्व कार्यालयातील उपलब्ध कामे बेरोजगारांच्या संस्थांना मिळण्याकरिता सदर कामे सहाय्यक संचालक, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, सांगली-मिरज रोड, विजयनगर, सांगली यांना कळविण्यात यावीत, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक संचालक एस. के. माळी यांनी केले आहे.

ठळक मुद्देबेरोजगाराच्या सेवा सोसायट्यांसाठी कामे कळवा : एस. के. माळीमहाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम कायद्याविषयी जनजागृती करा

सांगली : शासनाच्या सर्व कार्यालयातील उपलब्ध कामे बेरोजगारांच्या संस्थांना मिळण्याकरिता सदर कामे सहाय्यक संचालक, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, सांगली-मिरज रोड, विजयनगर, सांगली यांना कळविण्यात यावीत, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक संचालक एस. के. माळी यांनी केले आहे.

शासन निर्णय दिनांक १७ ऑगस्ट २००२, १ फेब्रुवारी २००६ व दिनांक ११ डिसेंबर २०१५ नुसार बेरोजगाराच्या सेवा सोसायट्यांना तीन लाखाच्या आतील कामे विना-निविदा देणे आवश्यक आहे. हा शासन निर्णय शासनाच्या सर्व कार्यालयांना, निमशासकीय संस्था, महामंडळे यांना लागू आहे.माळी म्हणाले, शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे अटी व शर्ती तपासून सेवा सोसायट्याकडून प्राप्त झालेले प्रस्ताव काम वाटप समिती समोर सादर करण्यात येतात. त्यानुसार पात्र संस्थांना काम वाटप करण्यात येते, याची दखल सर्व कार्यालयांनी घ्यावी. यापुढे कार्यालयाकडील उपलब्ध कामे परस्पर न देता शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे सादर करावीत.

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम कायद्याविषयी जनजागृती करा महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाचे बोधचिन्ह व घोषवाक्य शासकीय विभागांनी आपल्या विभागातील/ जिल्ह्यातील शासकीय बैठका, परिषदा, मेळावे इत्यादी ठिकाणी प्रसिध्द करून जनतेमध्ये महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम कायद्याविषयी जनजागृती करावी, असे आवाहन राज्य लोकसेवा हक्क आयोगाचे उप सचिव आण्णासाहेब चव्हाण यांनी केले आहे. आपली सेवा आमचे कर्तव्य हे महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाचे घोषवाक्य आहे.

टॅग्स :GovernmentसरकारSangliसांगली