शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
2
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
3
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
4
Nuwan Thushara Unplayable Delivery : 'बेबी मलिंगा'ची कमाल! लेगला चेंडू टाकत उडवली ऑफ स्टंप (VIDEO)
5
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
6
स्कॉर्पिओ, सेल्टोस अन् हॅरियरचीही ‘बोलती बंद’; लोकांनी या ढासू SUV वर लाखो रुपये केले खर्च! 
7
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
8
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
9
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
10
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
11
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
12
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
13
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
14
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
15
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
16
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
17
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
18
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
19
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
20
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”

सांगलीतील शेख बंधूंनी कुलूप-चावीवर साकारल्या महापुरुषांच्या हुबेहूब प्रतिकृती

By हणमंत पाटील | Updated: October 14, 2023 16:34 IST

सुरेंद्र दुपटे संजयनगर : सांगलीतील कुलूप-चावी दुरुस्ती आणि विक्री करणाऱ्या शेख बंधूंची कारागिरी सर्वत्र चर्चेत आली आहे. महापुरुषांवरील प्रेम ...

सुरेंद्र दुपटेसंजयनगर : सांगलीतील कुलूप-चावी दुरुस्ती आणि विक्री करणाऱ्या शेख बंधूंची कारागिरी सर्वत्र चर्चेत आली आहे. महापुरुषांवरील प्रेम व श्रद्धेतून त्यांनी कुलपावर छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या यांच्या हुबेहूब प्रतिकृती साकारली आहे. तसेच चावीवर ओम, ७८६ आदी चिन्हे कोरून ग्राहकांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला आहे. शेख बंधूंनी गणेशाची मूर्ती असणारे बनवलेले पितळी कुलूप सध्या गणरायाच्या सांगलीनगरीत चर्चेत आहे.सांगलीतील शहर पोलिस ठाण्याजवळच शेख बंधूंचे कुलूप-चावीचे दुकान आहे. दुकानात अकबर, वाहिद आणि अहमद हे शेख बंधू किल्ली बनवण्याचा व्यवसाय करतात. शेख बंधूंची ही तिसरी पिढी या व्यवसायात आहे. शेख बंधूंनी यापूर्वीही गणेशोत्सवात कुलपाच्या किल्लीमध्ये गणपती साकारला होता. गणेश भक्तांनी या कलाकृतीला दाद दिली होती. संपूर्ण पितळी असणारे हे कुलूप अनेकांनी खरेदी केले. अशा प्रकारची कुलपे जुन्या काळातील राजवाडा किंवा हवेलीसाठी तसेच तिजोरीसाठी वापरली जात होती. अशा प्रकारचे पितळी कुलूप शेख बंधूंनी बनवले आहे. 

नवीन कलाकृतीसाठी प्रयत्नशील...शेख बंधू हे ठराविक दिवसांनंतर कुलूप-चावीमध्ये वेगळी कलाकृती घेऊन ग्राहकांसमोर जातात. गणपतीच्या रूपातील किल्लीसह शेख बंधूंनी छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, हनुमान, प्रभू येशू, ७८६, क्रॉस, ओम, ताजमहाल, हार्ट, बंदूक, तलवार अशा कलाकृती साकारल्या आहेत. तसेच नवीन कलाकृतीसाठी सदैव ते प्रयत्नशील दिसतात.

टॅग्स :Sangliसांगली