शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीतील प्रथितयश उद्योजक, प्रयोगशील शेतकरी रंगराव इरळे यांचे निधन

By संतोष भिसे | Updated: June 30, 2023 18:22 IST

ह्रद्यविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन

सांगली : प्रथितयश उद्योजक आणि प्रयोगशील शेतकरी रंगराव कृष्णा इरळे (वय ७३) यांचे शुक्रवारी (दि. ३०) ह्रद्यविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. सकाळी अकराच्या सुमारास ह्रद्यविकाराचा त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात नेण्यात आले, पण उपचारापूर्वीच त्याचे निधन झाले. सावर्डे (ता. तासगाव) या त्यांच्या मूळ गावी सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.दाजी या नावाने ते बहुपरिचित होते. अखिल भारतीय माळी समाज, शिवप्रसाद पतसंस्था आदी संस्थांच्या उभारणीत त्यांचा सिंहाचा वाटा होता. सांगलीतील माळी मंगल कार्यालय, शिवप्रसाद विकास परिषद आदी संस्थांचे आधारस्तंभ होते. सावर्डे येथे त्यांची मोठ्या प्रमाणात द्राक्षबागायत आहे.  तरुण वयात काही काळ पुण्यात खासगी कंपनीत नोकरीनंतर ते सांगलीला परतले. द्राक्षांच्या पॅकिंगसाठी बॉक्सचे उत्पादन सुरु केले. पहिल्या टप्प्यात सांगलीत औद्योगिक वसाहतीत सुयोग पॅकवेल उद्योग सुरु केला. त्यानंतर मिरज औद्योगिक वसाहतीतही कारखाना सुरु केला.  हा दक्षिण महाराष्ट्रातील सर्वात मोठा पॅकेजिंग उद्योग समूह ठरला आहे. विविध संस्थांनी अनेक पुरस्कारांनी त्यांचा सन्मान केला होता. त्यांच्या अचानक निधनाने सांगली, मिरजेतील उद्योगजगताला धक्का बसला. सायंकाळी अंत्यसंस्कारासाठी मोठ्या संख्येने उद्योजक सावर्डे येथे हजर होते.

टॅग्स :Sangliसांगली