आष्टा : येथील बापूसाहेब शिंदे सेवाभावी संस्था, सेवानिवृत्त एसटी कर्मचारी संघटना तसेच सहयोगी संस्था यांच्या वतीने लोकसहभागातून आष्टा बसस्थानकामधील स्वच्छतागृहाचे नूतनीकरण करण्यात आले. अनेक वर्षांपासून रखडलेले काम पूर्ण झाल्याने प्रवाशांतून समाधान व्यक्त होत आहे.
बसस्थानकात गणेश नागरी पतसंस्थेकडून सिमेंटचे बाक देण्यात येणार आहेत. जायंट्स ग्रुप यांच्या वतीने वृक्षारोपण करण्यात येणार आहे. या कामासाठी बसस्थानकालगतचे दुकानदार व रिक्षा संघटना, तगारे प्रतिष्ठान, केतन सोपारकर, रवींद्र जाधव, वैभव ताम्हणकर, वैभव साठ्ये, पोपट झांबरे, लक्ष्मण कांबळे, भीमसेन कर्दिंन, प्रवीण हाबळे, झांबरे गुरुजी, राजेंद्र मळणगावकर, विक्रम भोपे, अमोल देसाई, नंदकुमार पाटील, शंकरराव कदम, सचिन मंडपे, अमित कोपर्डेकर, पंकज पाटील, राजू कदम, किरण भंडारे, रामचंद्र सावंत, अशोक मदने, वसंत कांबळे, प्रसाद देसाई, शहाजान जमादार, गणेश टोमके यांनी मदत केली.
यावेळी सर्जेराव तांबवेकर, नागनाथ काळोखे, सुभाष तगारे, कोळीसाहेब, अब्बास लतीफ, शंकरराव कदम, राजेंद्र मळणगावकर, महादेव झांबरे, सपाटे गुरुजी, कुमार माळी, संग्राम शिंदे, अशोक मदने, वसंत कांबळे, प्रसाद देसाई, शहाजान जमादार, गणेश टोमके, आनंदराव कटारे उपस्थित होते.
फोटो-२०आष्टा१
फोटो ओळ : आष्टा बसस्थानकातील स्वच्छतागृहाच्या नूतनीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले. यावेळी संग्राम शिंदे, अशोक मदने, शहाजान जमादार, अब्बास लतीफ, नागनाथ काळोखे, राजेंद्र मळणगावकर, वसंत कांबळे, कुमार माळी आदी उपस्थित होते.