शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

प्रधानमंत्री विमा योजनेचे नुतनीकरण करा : अभिजित चौधरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 13:27 IST

प्रधानमंत्री सुरक्षा योजना व प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना सर्वांसाठी सुरु करण्यात आल्या आहेत. या योजना बँका व पोस्ट आॅफिसमार्फत गरीब व वंचितांसाठी राबविल्या जातात. या योजनांचे ३१ मेपर्यंत नुतनीकरण होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.

ठळक मुद्दे प्रधानमंत्री विमा योजनेचे नुतनीकरण करा : अभिजित चौधरी३१ मेपर्यंत नुतनीकरणाची मुदत

सांगली : प्रधानमंत्री सुरक्षा योजना व प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना सर्वांसाठी सुरु करण्यात आल्या आहेत. या योजना बँका व पोस्ट आॅफिसमार्फत गरीब व वंचितांसाठी राबविल्या जातात. या योजनांचे ३१ मेपर्यंत नुतनीकरण होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.जिल्हाधिकारी डॉ. चौधरी म्हणाले, जिल्ह्यातील सर्व बॅँका व पोस्ट आॅफिसच्या माध्यमातून ५ लाख ४१ हजार ग्राहकांनी सुरक्षा विमा योजनेत तर २ लाख ३९ हजार ग्रहाकांनी जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गत सहभाग नोंदविला आहे.

जिल्ह्याची लोकसंख्या पाहता हे प्रमाण कमी आहे. ज्यांच्या खात्यांवर पुरेशी रक्कम असणार नाही, ते योजनेतून बाहेर पडतील व त्यांना या योजनांचा लाभ मिळणार नाही.सुरक्षा विमा योजना ही अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व यासाठी रुपये २ लाखांचे विमा संरक्षण देणारी योजना असून १८ ते ७० या वयोगटातील व्यक्ती यामध्ये सहभाग घेऊ शकतात. या योजनेचा वार्षीक हप्ता फक्त १२ रूपये आहे.

जीवन ज्योती विमा योजना ही नैसर्गिक अथवा अपघाती मृत्यू झाल्यास रुपये २ लाखांचे विमा संरक्षण देणारी योजना असून वय वर्षे १८ ते ५० या वयोगटातील व्यक्ती यामध्ये सहभाग घेऊ शकतात. तरी सर्वांनी योजनांचे नुतनीकरण करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्रSangliसांगली