शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

सांगली शहरात प्रायोगिक तत्त्वावर प्रायोगिक तत्त्वावर सुधारीत वाहतूक नियोजन जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2018 17:39 IST

महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन 1951 चे कलम 33 पोटकलम (1) (ब) रहदारी अधिकारान्वये पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील वाहतूक व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी दिनांक 13 एप्रिल 2018 रोजी पर्यंत सुधारीत वाहतूक नियोजन जाहीरनामा प्रायोगिक तत्त्वावर प्रसिध्द केला आहे.

ठळक मुद्देसांगली शहरात सुधारीत वाहतूक नियोजन जाहीरप्रायोगिक तत्त्वावर नियोजन

सांगली : महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन 1951 चे कलम 33 पोटकलम (1) (ब) रहदारी अधिकारान्वये पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील वाहतूक व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी दिनांक 13 एप्रिल 2018 रोजी पर्यंत सुधारीत वाहतूक नियोजन जाहीरनामा प्रायोगिक तत्त्वावर प्रसिध्द केला आहे.या आदेशानुसार वाहतुक सुरळीत होण्याकरीता हरभट रस्त्यावरील भगवानलाल कंदी दुकान (महानगरपालिका चौक ) ते टिळक चौक (करमरकर दवाखाना ते डोंगरे सराफ खेरीज) सम तारखेस व व टिळक चौक ते वासुदेव बळवंत फडके रिक्षा स्टॉप (धोंगडे फोटो स्टुडीओ ते नॉव्हेल प्रॉडक्टर दुकान खेरीज) पर्यंत विषम तारखेस प्रायोगिक तत्वावर सम-विषम फक्त दुचाकी वाहनांना सकाळी 8.00 ते 21.00 वाजेपर्यंत पार्कीग व्यवस्था करण्यात आली आहे.

करमरकर दवाखाना ते डोंगरे सराफ पर्यंत सम तारखेस व धोंगडे फोटो स्टुडिओ ते नॉव्हेल प्रॉडक्टर पर्यंत विषम तारखेस फक्त चारचाकी वाहनांना सकाळी 8.00 ते 21.00 वाजेपर्यंत पार्कीग व्यवस्था करण्यात आली आहे.वाहन चालकांनी व जनतेने बदल केलेल्या वाहतूक नियोजनास सहकार्य करावे. तसेच आपल्या हरकती, सुचना पोलीस निरीक्षक वाहतुक नियंत्रण शाखा सांगली किंवा पोलीस अधीक्षक कार्यालयास पाठवाव्यात. जेणेकरून प्राप्त झालेल्या सुचनांचे अवलोकन केल्यानंतर वाहतूक नियोजनात योग्य ते बदल करण्यात येतील, असे पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी स्पष्ट केले आहे. 

टॅग्स :SangliसांगलीRto officeआरटीओ ऑफीस