शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीतील वसंतदादा शेतकरी बँकेची नोंदणी अखेर रद्द, सहकार आयुक्तांचा निर्णय 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 13:39 IST

जयश्री पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर आदेश दिल्याची चर्चा रंगली

सांगली : येथील वसंतदादा शेतकरी सहकारी बँकेची नोंदणी अखेर रद्द करण्यात आली आहे. सहकार आयुक्तांनी हा निर्णय घेतला असून महापालिका उपायुक्त स्मृती पाटील यांची कस्टोडियन म्हणून नियुक्ती केली असून बँकेचे अस्तित्व लवकरच संपणार आहे.वसंतदादा शेतकरी सहकारी बँकेतील गैरव्यवहार प्रकरणी चौकशी अधिकारी आर. डी. रैनाक यांची नेमणूक शासनाने केली होती. २००९ मध्ये लेखा परीक्षणात गैरव्यवहार उघडकीस आले. संचालकांनी नियमबाह्य कर्ज वाटप करून ३५० कोटींचे नुकसान केल्याचा ठपका होता. त्यामुळे रिझर्व्ह बँकेने २०१० मध्ये परवाना रद्द केला. सहकार विभागाने अवसायक नेमला होता.अवसायकांच्या कारभारावरही संशय व्यक्त केला जात आहे. मुख्य इमारतीची १५ गुंठे जागा बाजारभावापेक्षा कमी किमतीत विकल्याची तक्रार आहे. एका अवसायकाने सव्वा कोटींचे नुकसान केल्याचा ठपका असूनही वसुली झालेली नाही. सध्या बँकेकडे १५५ कोटींच्या ठेवी, तर १६५ कोटींची कर्जवसुली आहे. मोठ्या कर्जदारांकडून वसुली बाकी आहे.आर. डी. रैनाक यांच्या चौकशीत २० संचालक, दोन अधिकाऱ्यांवर १९५ कोटींच्या नुकसानीचा ठपका ठेवण्यात आला आहे. वसुलीचे आदेश दिले असले तरी अंमलबजावणी धीम्या गतीने सुरू आहे. आता तर वसंतदादा शेतकरी बँकेची शासनाने नोंदणीच रद्द केली आहे. तसेच दोन वर्षासाठी महापालिका उपायुक्त स्मृती पाटील यांची कस्टोडियन अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.

जयश्री पाटील यांच्या प्रवेशानंतर प्रक्रिया चालूवसंतदादा शेतकरी बँकेची नोंदणी रद्दबाबतचा आदेश आठ दिवसांपूर्वी झाला. जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर आदेश दिल्याची चर्चा रंगली आहे. नोंदणी रद्द झाल्यानंतर दोषी संचालकांवरील कारवाईचे पुढे काय होणार, अशी चर्चा वसंतदादा बँकेच्या सभासदांमध्ये रंगली आहे.

मुख्य मुद्दे

  • चौकशी अधिकारी आर. डी. रैनाक यांनी आणला घोटाळा उजेडात
  • ३५० कोटींचा गैरव्यवहार, संचालक जबाबदार
  • मुख्य इमारत कमी दरात विकल्याची तक्रार
  • ठेवीदारांचे १८९ कोटी विमा रकमेतून परत
  • वसुलीची प्रक्रिया अद्याप अपूर्ण