शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळी स्पेशल रेल्वेचा सांगलीला रेड सिग्नल; जोधपूर-बेंगलोर एक्सप्रेसचा थांबा केवळ मिरजेलाच

By अविनाश कोळी | Updated: November 6, 2023 15:44 IST

रेल रोको आंदोलनाचा इशारा

सांगली : दिवाळी विशेष जोधपूर-बेंगलोर एक्सप्रेसला संपूर्ण मार्गावर एकूण ३२ थांबे देताना पश्चिम महाराष्ट्रात पुण्यानंतर सर्वाधिक उत्पन्न देणाऱ्या सांगलीरेल्वे स्टेशनला डावलण्यात आले आहे. त्यामुळे प्रवासी संघटनांमधून संताप व्यक्त होत आहे.मुंबई, पुणे, बेंगलोर, सुरत, बडोदा, अहमदाबादला जाणाऱ्या सर्व नियमित रेल्वे गाड्या फुल्ल आहेत. त्यामुळे जोधपूर-अहमदाबाद-सुरत-मुंबई-हुबळी-बेंगलोर मार्गावर १४ विशेष गाड्या दिवाळीमध्ये सोडण्यात येत आहेत. पण त्या गाड्यांना सांगली रेल्वे स्टेशनवर थांबा देण्यात आला नाही. या सर्व गाड्या सांगली रेल्वे स्टेशनवरून सुसाट निघून जातील. अन्य ठिकाणी जवळच्या दोन ते तीन स्थानकावर थांबे दिले असताना केवळ सांगली जिल्ह्यात एकमेव मिरजेलाच थांबा दिला आहे. सांगलीला नेहमीच नव्या रेल्वेंसाठी रेड सिग्नल दाखविला जातो. त्यामुळे प्रवाशी संघटनांनी याबाबत संताप व्यक्त केला आहे.

रेल्वेनेच निकष बाजुला केलामध्य रेल्वेच्या पुणे विभागात पुण्यानंतर सर्वाधिक उत्पन्न देणारे सांगली रेल्वे स्टेशन आहे. याठिकाणी एसी व स्लीपर क्लासची तिकिटे मोठ्या प्रमाणावर बुक होतात. सांगली स्टेशनवर थांबणाऱ्या जवळपास सर्व एक्सप्रेस गाड्यांचे प्रतिदिन प्रति फेरी उत्पन्न ४० हजार ते ६० हजार आहे. रेल्वे बोर्डाच्या निकषाप्रमाणे ज्या रेल्वे स्टेशनचे प्रति दिवस प्रति फेरी उत्पन्न १२ हजार पेक्षा जास्त असेल त्या रेल्वे स्टेशनवर प्रत्येक एक्सप्रेस गाडीला थांबा द्यावा लागतो. रेल्वे बोर्डाच्या निकषापेक्षा सांगली रेल्वे स्टेशनचे उत्पन्न पाचपट आहे. तरीही दिवाळी विशेष रेल्वे गाडी व संपर्क क्रांती यांना सांगली रेल्वे स्टेशनवर थांबा दिला नाही.

रेल रोको आंदोलनाचा इशारादिवाळी विशेष गाडी क्र. ०४८१३/०४८१४ जोधपूर(भगत की कोठी)-बेंगलोर दिवाळी विशेष गाडी, गाडी क्र. २२५८५/२२५८६ व १२६२९/१२६३० संपर्क क्रांतीला सांगली रेल्वे स्टेशनवर त्वरित थांबा द्यावा, अन्यथा ही गाडी सांगली रेल्वे स्टेशनवर थांबविण्यात येईल, असा इशारा नागरिक जागृती मंचचे सतीश साखळकर यांनी दिला आहे.

प्रत्येकवेळी नवी गाडी सुरु करताना मिरजेसह सांगलीलाही थांबा द्यायला हवा. सांगली हे जिल्ह्याचे मुख्य ठिकाण तसेच महापालिका आहे. याशिवाय रेल्वेच्या निकषापेक्षा अधिक उत्पन्न सांगलीचे स्थानक देते. त्यामुळे थांबे मंजूर करायला हवेत. - उमेश शहा, रेल्वे डेव्हलपमेंट ग्रुप

टॅग्स :Sangliसांगलीrailwayरेल्वेDiwaliदिवाळी 2023