शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

आयकर विभागात विविध पदासाठी खेळाडू भरती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 18:20 IST

government jobs update Sangli : केंद्र शासनाच्या आयकर विभागात राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील सहभागी तसेच प्राविण्यधारक खेळाडूकरीता विविध पदासाठी खेळाडू भरती होणार आहे. यासाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा, आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धा, शालेय राष्ट्रीय स्पर्धा सहभागी व प्राविण्यप्राप्त खेळाडूंकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

ठळक मुद्देआयकर विभागात विविध पदासाठी खेळाडू भरतीपात्र खेळाडूंनी कामगिरी प्रमाणित करण्यासाठी अर्ज सादर करावेत-माणिक वाघमारे

सांगली : केंद्र शासनाच्या आयकर विभागात राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील सहभागी तसेच प्राविण्यधारक खेळाडूकरीता विविध पदासाठी खेळाडू भरती होणार आहे. यासाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा, आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धा, शालेय राष्ट्रीय स्पर्धा सहभागी व प्राविण्यप्राप्त खेळाडूंकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. तरी सांगली जिल्ह्यातील राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा खेळलेल्या पात्र खेळाडूंनी कामगिरी प्रमाणित करण्यासाठीचे अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी माणिक वाघमारे यांनी केले आहे.यासाठी खेळाडूंनी त्यांनी मिळविलेल्या क्रीडा प्राविण्याची प्रमाणपत्रे संबंधित प्राधिकरणाकडून प्रमाणित करून घेणे आवश्यक आहे. राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेत सहभागी खेळाडूंनी आपली प्रमाणपत्रे आयुक्त क्रीडा व युवक सेवा, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडून प्रमाणित करून घ्यावयाची आहेत.

सद्यपरिस्थितीत कोविड-19 विषाणूचा प्रादुर्भावाचा विचार करता राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंनी व्यक्तीश: पुणे येथे उपस्थित राहणे धोक्याचे असल्याने आयकर भरतीसाठी इच्छुक असलेल्या पात्र खेळाडूंची कामगिरी प्रमाणित करून घेण्यासाठीचे अर्ज जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात स्वीकारून क्रीडा व युवक सेवा संचालनालयास सादर करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार सांगली जिल्ह्यातील पात्र खेळाडूंचे अर्ज जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथे स्विकारून क्रीडा व युवक सेवा संचालनालयात सादर करण्यात येणार आहेत.सांगली जिल्ह्यातील राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा खेळलेल्या पात्र खेळाडूंनी कामगिरी प्रमाणित करण्यासाठीचे अर्ज जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, साई फिटनेस सेंटर, नविन इमारत, मालू हायस्कूल समोर, गुलमोहर कॉलनी, दक्षिण शिवाजीनगर, सांगली येथे सादर करावेत, असे आवाहनही वाघमारे यांनी केले आहे.

टॅग्स :Income Tax Officeमुख्य आयकर आयुक्त कार्यालयgovernment jobs updateसरकारी नोकरीSangliसांगली