शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

खूशखबर! सांगली महापालिकेत नव्या वर्षात नोकरभरती, उत्पन्नही वाढविणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2022 17:49 IST

महापालिकेच्या उत्पन्नवाढीसाठी विविध उपाययोजना सुरू

सांगली : अनेक वरिष्ठ अधिकारी निवृत्त झाल्यानंतर कंत्राटी अधिकारी, कर्मचाऱ्यावर महापालिकेचा गाडा सुरू आहे. जानेवारी महिन्यात महापालिकेच्या आकृतिबंधाला शासनाकडून मान्यता मिळणार आहे. त्यानंतर अत्यावश्यक पदाची भरती केली जाणार असल्याचे आयुक्त सुनील पवार यांनी पत्रकार बैठकीत सांगितले.नववर्षाच्या पूर्वसंध्येला आयुक्तांनी नवनवे संकल्प सोडत महापालिकेला सक्षम करण्याचा निर्धार व्यक्त केला. पवार म्हणाले की, महापालिकेच्या आस्थापनेवर २३७८ पदे मंजूर आहेत. शहराचा विस्तार पाहता ही पदे कमी आहेत. त्यात अनेक अधिकारी, कर्मचारी निवृत्त झाल्याने कामकाजात अडचणी येत आहेत. प्रशासनाने नवीन आकृतीबंध शासनाला सादर केला आहे. त्यात नवीन २४६७ पदाची निर्मिती केली आहे. २० ते २५ जानेवारीपर्यंत आकृतीबंधाला मंजुरी मिळेल. त्यानंतर अत्यावश्यक व तांत्रिक पदाची भरती प्रक्रिया हाती घेतली जाईल.नवीन वर्षात कुपवाड ड्रेनेज योजना हाती घेतली जाईल. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात निविदा प्रक्रिया राबविली जाणार आहे. मलशुद्धीकरण केंद्राच्या जागेबाबत सुनावणी पूर्ण झाली आहे. लवकरच जागा ताब्यात घेतली जाईल. माझी वसुंधरांतर्गत महापालिकेला सात कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले आहे. यातील पन्नास टक्के निधीतून शहरात हरित उद्याने उभारली जाणार आहे. महापालिकेच्या खुल्या भूखंडावर वृक्षारोपणाची मोहीम हाती घेऊ. महापालिकेची उपविधी व सभा नियमावलीही तयार केली जाणार आहे. मोकाट कुत्र्यांचा प्रश्न गंभीर आहे. त्यासाठी डाॅग स्काॅड उभारणार आहोत.महापालिकेच्या उत्पन्नवाढीसाठी विविध उपाययोजना सुरू आहेत. २००४ साली घरपट्टीचे झोन तयार केले. तेव्हाचे दर आहेत. कोल्हापूर रोडवरील ४९० घरांचा सर्व्हे केला असता २६ लाखांचे उत्पन्न ५३ लाखापर्यंत वाढले. कोणतीही दरवाढ न करता घरपट्टीत वाढ होणार आहे.ट्रक पार्किंगच्या जागेत एसटीपीशेरीनाल्यावर ६७ कोटी रुपये खर्चाचा सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प उभारला जाणार आहे. त्यासाठी खासगी जागा घेण्याबाबत विचार होता. पण महापालिकेच्या ट्रक पार्किंगच्या जागेपैकी १० एकर जागेबाबत न्यायालयात खटला सुरू आहे. उर्वरित १७ एकर जागेपैकी दोन एकर जागेवर प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला असल्याचे पवार म्हणाले. 

टॅग्स :Sangliसांगली