शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीतील नोकरभरती, गाळे बांधकामाची चौकशी सुरु

By संतोष भिसे | Updated: November 29, 2022 18:59 IST

चौकशी अहवाल ३० दिवसांत सादर करण्याचे आदेश

सांगली : कृषी उत्पन्न बाजार समितीमधील आर्थिक गैरव्यवहाराच्या चौकशीचे आदेश सहकार उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी सोमवारी काढले. चौकशीसाठी विशेष लेखापरीक्षक संजय पाटील, सहायक निबंधक अनुष्का पाटील व विशेष लेखापरीक्षक अनिल पैलवान यांची नियुक्ती केली आहे. महिन्याभरात चौकशी पूर्ण करुन अहवाल सादर करण्याचे आदेश उपनिबंधकानी दिले आहेत.यासंदर्भात स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्ष सुनील फराटे यांनी तक्रार केली होती. समितीमधील अधिकारी, कर्मचाऱ्यांची पदोन्नती न नवी नोकरभरती यामध्ये गैरव्यवहार झाल्याचे त्यांनी म्हंटले होते.  कोल्हापूर रस्त्यावरील फळबाजार आवारातील जागा शीतगृहासाठी आरक्षित असताना तेथे व्यापारी गाळे बांधण्यात आल्याचीही तक्रार केली होती. उपनिबंधकांनी विशेष लेखापरीक्षक अनिल पैलवान यांच्यामार्फत ऑक्टोबर महिन्यात तक्रारींची चौकशी केली, त्यावेळी त्यात तथ्य आढळले. त्यानंतर गैरव्यवहारांच्या सखोल चौकशीचे आदेश काढले.आदेशात म्हंटले आहे की, १ एप्रिल २०१८ ते ३१ मार्च २०२० या कालावधीतील समितीच्या कामकाजाचे लेखापरीक्षण पूर्ण होऊन १७ ऑक्टोबररोजी अहवाल सादर झाला आहे. त्यामध्ये काही गंभीर बाबी, गैरप्रकार, प्रशासकीय कामकाजात दोष, पोटनियमांचे उल्लंघन आदी बाबी आढळल्या आहेत. समितीत आर्थिक अनियमितता झाल्याचेही दिसून येते. त्याची सखोल चौकशी झाल्यानंतरच समितीची नेमकी आर्थिक स्थिती स्पष्ट होणार आहे. त्यामुळे चौकशीचे आदेश देण्यात येत आहेत. चौकशी अहवाल ३० दिवसांत सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.गाळे बांधकामात गाळा?फराटे यांच्यासह आणखी काही संघटनांनी समितीच्या कामकाजाविषयी तक्रारी केल्या होत्या. फळ बाजार आवारातील गाळ्यांचे बांधकाम गैरव्यवहाराच्या अनुषंगाने चर्चेत होते. मिरज दुय्यम आवारातील गाळे बांधकामाविषयीदेखील बऱ्याच चर्चा झाल्या आहेत. उपनिबंधकांच्या चौकशीनंतर त्यातील गैरव्यवहार निश्चित होणार आहे

टॅग्स :Sangliसांगली