शहरं
Join us  
Trending Stories
1
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
2
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
3
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
4
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
5
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
6
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
7
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
8
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
9
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
10
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
11
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
12
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
13
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
14
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
15
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
16
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
17
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
18
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
19
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
20
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस

सूर्यनमस्कार योगसाधनेची लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्‌मध्ये नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2019 14:52 IST

सांगली जिल्ह्यात जत तालुक्यातील बालगाव येथे गतवर्षी दि. 21 जून 2018 रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित ऐतिहासिक योग शिबिराची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस्‌मध्ये नोंद घेण्यात आली आहे. सूर्यनमस्कार योगसाधनेबाबत लिम्का बुककडून जिल्हा प्रशासनाला नुकतेच प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे.

ठळक मुद्देसूर्यनमस्कार योगसाधनेची लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्‌मध्ये नोंदलिम्का बुककडून जिल्हा प्रशासनाला प्रमाणपत्र प्राप्त

सांगली : सांगली जिल्ह्यात जत तालुक्यातील बालगाव येथे गतवर्षी दि. 21 जून 2018 रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित ऐतिहासिक योग शिबिराची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस्‌मध्ये नोंद घेण्यात आली आहे. सूर्यनमस्कार योगसाधनेबाबत लिम्का बुककडून जिल्हा प्रशासनाला नुकतेच प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे.

गतवर्षी तत्कालिन जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांच्या पुढाकाराने जिल्हा प्रशासन व गुरूदेवाश्रम बालगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त ऐतिहासिक योग शिबिर घेण्यात आले. या शिबिरात सुमारे 1 लाख 10 हजार योगप्रेमींनी सहभाग घेऊन सूर्यनमस्कार योगसाधना केली.

या ऐतिहासिक क्षणाची नोंद जागतिक मान्यताप्राप्त एशियन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, मार्व्हलस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, हाय रेंज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आदि ठिकाणी यापूर्वीच झाली आहे. सर्वाधिक लोकांनी एकत्र येवून सूर्यनमस्कार योग साधना करण्याचा हा ऐतिहासिक क्षण असल्याच्या शब्दात वर्ल्ड बुक रेकॉर्डच्या प्रतिनिधींनी मोहोर उमटवली.याबाबत तत्कालिन जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांनी गुरूदेवाश्रम, बालगावचे अमृतानंद स्वामी आणि त्यांचे सहकारी, अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सहभाग, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व त्यांची टीम, पोलीस अधीक्षक व त्यांची टीम, जिल्हा माहिती कार्यालय व पत्रकारबंधू, तसेच, सहभागी नागरिक, विद्यार्थी यांच्या सहकार्यामुळे हा विक्रम झाल्याची भावना व्यक्त करून त्यांचे ऋणनिर्देश व्यक्त केले.

टॅग्स :YogaयोगSangliसांगली