शिराळा : येथील भुईकोट किल्ल्यावर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिनाच्या निमित्ताने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची विक्रमी रांगोळीचा लोकार्पण सोहळा पार पडला. रंगावलीकार सुनील कुंभार यांनी १८ रंगांच्या २४०० किलो रांगोळीत ७००० चौरसफुटात ३५ तासांत छत्रपती संभाजी महाराजांची रांगोळी रेखाटली.यावेळी निनाईदेवी शिक्षण संस्थेच्या ऑड. रेणुकादेवी देशमुख, जेष्ठ नेते संपतराव देशमुख, हणमंतराव पाटील,सुखदेव पाटील, के. डी. पाटील, युवा नेते रणजितसिंह नाईक, सम्राट शिंदे यांची प्रमुख उपस्थित होती.हा उपक्रम अँड रेणुकादेवी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हा राबविण्यात आला. ही रांगोळी डोंगरी भागात राहणारा, शिराळाचा भूमिपुत्र, अयोध्या प्रसिद्ध रांगोळी कलाकार सुनील कुंभार यांनी रेखाटली. १६ मार्च पर्यत रांगोळी पाहण्यासाठी खुली राहणार आहे. भव्य स्मारक सरकारच्या माध्यमातून मार्गी लागेलयावेळी रेणुकादेवी देशमुख म्हणाल्या, याच ठिकाणी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना सोडवण्याचा एकमेव प्रयत्न झाला. या ठिकाणी संभाजी महाराज यांचे भव्य स्मारक महायुती सरकारच्या माध्यमातून आमदार सत्यजित देशमुख यांच्या प्रयत्नातून मार्गी लागेल. शिराळासह व शिराळा पंचक्रोशितील हजारो मावळ्यांची व जनतेची ही मागणी पूर्ण होईल. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची गौरव शाली माहिती याठिकाणी लावण्यात आली आहे. ही रांगोळी ऐतिहासिक व विश्वविक्रमी ठरेल. सांगली जिल्ह्यात पहिल्यांदाच ही रांगोळी रेखाटण्यात आली आहे असे सांगितले.यावेळी कुलदीप निकम, पी. जी. शिंदे, बसवेशर शेटे, शुभम देशमुख, प्रशांत कुंभार, संतोष इंगवले, अशोक गायकवाड, प्रदीप पाटील, महादेव गायकवाड, विनोद पाटील, मोहन जरांगे, अभिजित यादव, अमोल काळे, रणजित कदम, शाहु निकम आदी उपस्थित होते.
Sangli: भुईकोट किल्ल्यावर रेखाटली संभाजी महाराजांची विक्रमी रांगोळी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 16:59 IST