शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

महापालिकेच्या उत्पन्न वाढीवर सूचनांचा पाऊस : सांगली महासभेत चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2019 01:17 IST

सांगली : महापालिकेच्या उत्पन्नवाढीवर शुक्रवारी विशेष महासभेत नगरसेवकांनी सूचनांचा पाऊस पाडला. पेट्रोल, डिझेलसह विद्युत खांबांवरही कर आकारण्याची मागणी नगरसेवकांनी ...

ठळक मुद्देखातेप्रमुखांना अहवाल सादर करण्याच्या सूचना

सांगली : महापालिकेच्या उत्पन्नवाढीवर शुक्रवारी विशेष महासभेत नगरसेवकांनी सूचनांचा पाऊस पाडला. पेट्रोल, डिझेलसह विद्युत खांबांवरही कर आकारण्याची मागणी नगरसेवकांनी केली. याबाबत सर्व खातेप्रमुखांनी सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश महापौर संगीता खोत यांनी सभेत दिले. १५ जानेवारीनंतर सर्व विभागाच्या मॅरेथॉन बैठका घेऊन दर सुधार समितीपुढे अहवाल देण्यात येईल, असेही महापौरांनी स्पष्ट केले.

महापौर संगीता खोत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष महासभेत उत्पन्नवाढीबाबत उपाययोजना सुचविण्यासाठी प्रस्ताव चर्चेला आला होता. यावेळी सर्वच सदस्यांनी प्रशासनाने आतापर्यंत उत्पन्नवाढीसाठी काय केले? सदस्यांनी सभागृहात उत्पन्नवाढीसाठी अनेक उपाययोजना सुचवूनही याची अंमलबजावणी केली जात नाही, याबद्दलही सदस्यांनी खंत व्यक्त केली.

विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर म्हणाले, उत्पन्नवाढीबाबत प्रशासनाला सर्व काही माहीत आहे. आधी प्रशासनाने बोलावे, व्यवहार आणि कायदा याची सांगड घालून प्रशासनानेच सांगावे की, उत्पन्न कसे वाढवता येईल. आम्ही लोकांना का अंगावर घ्यायचे? असा सवालही त्यांनी केला.संतोष पाटील म्हणाले, जीएसटी भरणाऱ्या सर्व लोकांना कराखाली आणा, यामुळे महानगरपालिकेचे उत्पन्न निश्चित वाढेल. पालिकेच्या आरोग्य विभागाकडून ९४ प्रकारचे परवाने दिले जातात. व्यवसाय करणारे सर्व व्यावसायिक शोधून काढा, ज्यांच्याकडे पालिकेच्या आरोग्य विभागाचा परवाना नाही, असे सर्व व्यवसाय बेकायदेशीर ठरवून कारवाई करा. शहरात अनेक ठिकाणी मोकळे प्लॉट आहेत, ज्यावर बांधकामे झालेली नाहीत, अशा जागा शोधून त्यांच्याकडून कर वसूल करा, दुकानगाळे, मुव्हेबल गाळे, खोकी यांच्याकडून साडेपाच कोटीची थकबाकी आहे. त्यांचे करार संपले आहेत. त्यांना बोलावून करार करुन वाढीव कर लावले पाहिजेत, असे ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले, मी सभापती असताना महानगरपालिका मालमता विभागाचे स्वतंत्र बँकेत खाते काढल्यानंतर दोन कोटी ४४ लाख रुपये जमा झाले होते. दर तीन महिन्यातून एकदा आढावा घेऊन उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.

सविता मदने म्हणाल्या, काही खासगी रुग्णालयांची नोंदच आरोग्य विभागाकडे आहे. सर्व रुग्णालये रेकॉर्डवर घ्या, यातून उत्पन्न वाढू शकते. स्वाती शिंदे यांनी, गाळे हस्तांतरण थांबवले आहे, ते सुरु केल्यास किमान एक कोटीचे उत्पन्न वाढू शकते, असे मत मांडले. शेखर इनामदार यांनी, उत्पन्न वाढीकडे वीस वर्षात प्रशासनाने गांभीर्याने पाहिले नाही. उत्पन्न वाढीसाठी अनेकउपाय आहेत. पर्यटनासाठी कसलीच तरतूद अंदाजपत्रकात नाही, असे सांगितले.

माजी उपमहापौर विजय घाडगे यांनी, संस्था चालली पाहिजे, यासाठी खातेप्रमुखांनी आतापर्यंत काय केले? असा सवाल केला. राजेंद्र कुंभार यांनी, गाळ्यांची मुदत संपली आहे, त्यांची दरवाढ करुन घ्या, डिजिटल बोर्ड लावायला एकाच कंपनीला ठेका का दिला जातो? स्पर्धा निर्माण होण्यासाठी जाहीर निविदा का मागवत नाही? असे प्रश्न उपस्थित केले. योगेंद्र थोरात यांनी, वायफाय टॉवर उभारल्यास त्यातून महापालिकेला चांगले उत्पन्न मिळेल, अशी सूचना मांडली.नगरसेवकांच्या सूचना...पेट्रोलवर लिटरमागे १० पैसे कर आकारावाव्यापाºयांकडील थकीत एलबीटी वसूल करावाअपार्टमेंटमध्ये सर्वांना पाणी कनेक्शन बंधनकारक करावेरुग्णालये, मंगल कार्यालयामधील पाणी मीटर तपासाखोकी हस्तांतरणाच्या प्रलंबित प्रस्तावांची निर्गती करावीखासगी रुग्णालयांच्या फीमध्ये वाढ करावीज कंपनीच्या खांबांना भाडे आकारणी करामहापालिकेच्या खुल्या जागेवर व्यापारी संकुल उभारावेतघरपट्टीचा नव्याने सर्व्हे करावा

टॅग्स :SangliसांगलीMuncipal Corporationनगर पालिका