जिल्हा बँकेच्या अर्थचक्रास आपत्तीचे ग्रहण-५८४ कोटी रुपये पीककर्ज थकीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2019 12:11 AM2019-11-07T00:11:12+5:302019-11-07T00:44:51+5:30

आपत्तीमुळे जिल्ह्यातील अर्थचक्राला दणका बसला आहे. कृषी क्षेत्राला जिल्हा बँकेवर विसंबून राहावे लागते. त्यामुळे एकूण पीक कर्जापैकी सर्वाधिक वाटा जिल्हा बँकेचा असतो. बँकेने १ एप्रिल २0१९ ते ३0 सप्टेंबर २0१९ या काळात ९३ हजार ६२४ कर्जदारांना ५९ हजार ४२४ हेक्टरसाठी ५८४ कोटी ५३ लाखाचा कर्जपुरवठा केला आहे.

 Receipt of disaster for district bank finance | जिल्हा बँकेच्या अर्थचक्रास आपत्तीचे ग्रहण-५८४ कोटी रुपये पीककर्ज थकीत

जिल्हा बँकेच्या अर्थचक्रास आपत्तीचे ग्रहण-५८४ कोटी रुपये पीककर्ज थकीत

Next
ठळक मुद्देप्रशासनासमोर कर्जवसुली बनली डोकेदुखी

अविनाश कोळी ।
सांगली : आपत्तीच्या दुष्टचक्रात सापडलेल्या जिल्ह्यातील शेतकरी उद्ध्वस्त होत असताना, कृषी क्षेत्राचा मुख्य कणा असलेल्या जिल्हा बँकेच्या अर्थचक्रालाही दणका बसला आहे. सध्या बँकेची ५८४ कोटी ५३ लाख १३ हजार रुपयांची पीक कर्जाची थकबाकी असून, यातील ४0 टक्के कर्जदारांना अवकाळी पावसाने कवेत घेतल्याने, अडीचशे कोटीची वसुली थांबणार आहे.

आपत्तीमुळे जिल्ह्यातील अर्थचक्राला दणका बसला आहे. कृषी क्षेत्राला जिल्हा बँकेवर विसंबून राहावे लागते. त्यामुळे एकूण पीक कर्जापैकी सर्वाधिक वाटा जिल्हा बँकेचा असतो. बँकेने १ एप्रिल २0१९ ते ३0 सप्टेंबर २0१९ या काळात ९३ हजार ६२४ कर्जदारांना ५९ हजार ४२४ हेक्टरसाठी ५८४ कोटी ५३ लाखाचा कर्जपुरवठा केला आहे. यातील ४0 टक्के शेतकऱ्यांना अवकाळी पावसाने उद्ध्वस्त केल्याचा अंदाज आहे. त्यामुळे सुमारे २३0 ते २५0 कोटी रुपयांची वसुली बाधित होणार आहे.

एप्रिल महिन्यात शासनाच्या कर्जमाफी योजनेमुळे जिल्हा बँकेच्या वसुलीवर परिणाम झाला. आॅगस्टमध्ये महापुराने जिल्ह्याला कवेत घेतले. महापुराने बाधित १0४ गावांतील पिकांच्या नुकसानीचे पंचनामे अद्याप पूर्ण झालेले नाहीत. पीक कर्जाची वसुली बँकेला करता आली नाही. आता आॅक्टोबरमध्ये अवकाळी पावसाने थैमान घातल्याने ५५ हजार १३३ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. त्यांच्या वसुलीचा प्रश्नही जिल्हा बँकेसमोर आहे. वर्षातील आठ महिने आपत्तीला तोंड देणाºया शेतकऱ्यांबरोबरच जिल्हा बँकेसमोरही आर्थिक आपत्ती निर्माण झाली आहे. बिघडलेले अर्थचक्र आता पूर्वपदावर येण्यासाठी मोठा काळ जाणार आहे. शेतकºयांना कर्जमाफी किंवा भरपाई मिळत असताना, बँकांना मात्र कोणत्याही प्रकारची भरपाई मिळत नाही.

एनपीएवर होणार परिणाम
बँकेचा सध्याचा एनपीए (नॉन प्रोडक्टीव्ह असेट्स) ५३६ कोटीचा असून त्यात पीक कर्जाचे ६२ कोटी आहेत. याची टक्केवारी ११.८३ टक्के असून नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकºयांबरोबर बँकेच्या एनपीएलाही मोठा दणका बसणार आहे. उसाचे नुकसान झाल्यामुळे यावर्षी कारखान्यांचे गाळप घटणार आहे. त्यामुळे बिगरशेती कर्जदार म्हणून बँकेला दुहेरी नुकसानीस सामोरे जावे लागेल.

दरवर्षी ३२ कोटीचा तोटा
शेतीकर्जातून बँकेला कधीही फायदा होत नाही. दरवर्षी ३२ ते ३४ कोटी रुपये शेतीकर्जातून नुकसान होत असते. तरीही शेतकºयांची बॅँक म्हणून शेतीकर्जाची सेवा ती बजावत असते.

  • उसाच्या ३0,४0३ हेक्टर क्षेत्राकरिता
  • ४९ हजार ३0४ शेतकºयांना
  • जिल्हा बँकेमार्फत यावर्षी ऊस लागवडीकरिता ३00 कोटी ९९ लाख ९३ हजाराचा कर्जपुरवठा

 

  • जिल्ह्यातील ५,१९६.३५ हेक्टर द्राक्षबागांसाठी

१0 हजार ५१४ शेतकºयांना
१४४ कोटी ७२ लाख
५८ हजार रुपये कर्ज

  • डाळिंबाच्या ७,३८८.८९ हेक्टर क्षेत्राकरिता

११ हजार ४५७ शेतक-यांना
८३ कोटी ९२ लाख ७४ हजार रुपयांचा कर्जपुरवठा केला आहे.

  • याशिवाय अन्य पिकांना केलेला कर्जपुरवठाही मोठा आहे.

 

शासनाकडून दुर्लक्ष: दिलीपतात्या पाटील
शेतकऱ्यांना कर्जमाफी, भरपाई मिळालीच पाहिजे. बँक त्यासाठी आग्रही आहे. मात्र बँकेच्या अर्थकारणावर त्याचा परिणाम होत असताना बँकेलाही शासनाने मदतीचा हात दिला पाहिजे. बँक आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्यामुळे इतक्या संकटातही तरली आहे, असे मत जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील यांनी व्यक्त केले.

Web Title:  Receipt of disaster for district bank finance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.