शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
2
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
3
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
4
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
5
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
6
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
7
फक्त ४ हजारांत मिळणारा एआय फोन अवघ्या २४ तासांत सोल्ड आउट!
8
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
9
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा
10
इन्स्टावर ओळख, १४००० किमीचा प्रवास करून मुलगी भारतात, पाठोपाठ घरचेही आले अन् सर्वांना बसला धक्का
11
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
12
शरिया कायद्यातील 'ब्लड मनी' काय आहे? निमिषा प्रियाचा जीव वाचवण्याचा शेवटचा मार्ग
13
BHEL: दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, बीएचईएलमध्ये भरती सुरू, 'अशी' होणार निवड!
14
हृदयस्पर्शी! १४ वर्षांनी लेकाने पूर्ण केलं वडिलांचं स्वप्न, गिफ्ट केली बुलेट, Video पाहून पाणावले डोळे
15
१४ गावांचा प्रश्न मिटणार, तेलंगणातून महाराष्ट्रात येणार; CM देवेंद्र फडणवीसांनी दिले निर्देश
16
विभान भवनाच्या आवारात गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांमध्ये तुफान राडा, शिविगाळ
17
स्टार प्रवाहनंतर तेजश्री प्रधानचा 'झी मराठी'कडे यू-टर्न, यावर सतीश राजवाडे म्हणाले....
18
मालमत्तेवरून वाद विकोपाला, धाकट्या भावाने थोरल्या भावाच्या कुटुंबाच्या अंगावर घातली गाडी, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
19
निमिषा प्रिया प्रकरण : फाशी टळली, पण दिलासा नाहीच! अता तलालचा भाऊ म्हणाला, "खून खरीद नहीं सकते, अल्लाह...!"
20
१० वर्षांच्या मुलाने चालवला ट्रक, लोकांचा जीव धोक्यात; Video पाहून चुकेल काळजाचा ठोका

महापालिकेतील काँग्रेसमध्ये बंडाळी

By admin | Updated: January 28, 2015 00:57 IST

महापौर, उपमहापौर निवड : वसंतदादा-कदम गटात संघर्षाची ठिणगी, सदस्य संभ्रमात

सांगली : महापालिकेच्या महापौर, उपमहापौर निवडीला आज, मंगळवारी नाट्यमयरित्या राजकीय वळण लागले. सत्ताधारी गटाचे नेते माजी मंत्री मदन पाटील यांनी महापौर पदासाठी विवेक कांबळे व उपमहापौर पदासाठी प्रशांत पायगोंडा पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले असताना, शेवटच्याक्षणी उपमहापौर पदासाठी आ. पतंगराव कदम गटाकडून काँग्रेसच्या वंदना कदम यांनी अर्ज दाखल करीत बंडखोरी केली. त्यामुळे सत्ताधारी गटात अस्वस्थता पसरली होती. महापौर पदासाठी तीन, तर उपमहापौर पदासाठी चार अर्ज दाखल झाले असून, निवडीची प्रक्रिया ३१ रोजी होणार आहे. महापौर पदासाठी काँग्रेसकडून विवेक कांबळे, राष्ट्रवादीतून शेडजी मोहिते, स्वाभिमानी आघाडीतून बाळू गोंधळी यांनी, तर उपमहापौर पदासाठी काँग्रेसकडून प्रशांत पाटील, वंदना कदम, राष्ट्रवादीतून राजू गवळी व स्वाभिमानीतून शिवराज बोळाज यांनी आज, मंगळवारी अर्ज दाखल केले. पालिकेत काँग्रेसचे पूर्ण बहुमत असून ४२ सदस्य आहेत. तसेच राष्ट्रवादीचे २५ व स्वाभिमानीचे ११ सदस्य आहेत. महापौर व उपमहापौर पदासाठी सुरुवातीला एकतर्फी वाटणाऱ्या निवडणुकीत चांगलाच रंग भरल्याने उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. महापौर व उपमहापौर निवडीवरून पालिकेत मोठा खल सुरू आहे. महापौर पदासाठी विवेक कांबळे यांचे नाव सुरुवातीपासूनच आघाडीवर होते. त्यात मिरजेचे बसवेश्वर सातपुते यांनी हक्क सांगितल्याने रंग भरला होता. तसेच उपमहापौर पदासाठी सत्ताधारी गटात मोठी चुरस होती. प्रशांत पाटील, वंदना कदम, अनारकली कुरणे, अलका पवार अशी अनेक नावे चर्चेत होती. काल, सोमवारी सायंकाळी मदन पाटील यांनी कळंबीतील फार्म हाऊसवर नगरसेवकांची बैठक घेतली. प्रत्येक नगरसेवकाचे स्वतंत्ररित्या मत ऐकून घेतले. आज, मंगळवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत होती. सकाळपासून इच्छुक पालिकेत ठाण मांडून होते. गटनेते किशोर जामदार सातत्याने मदन पाटील यांच्या संपर्कात होते. दुपारी चार वाजता मदन पाटील यांचे स्वीय सहायक सतीश हेरवाडे हे बंद लिफाफा घेऊन पालिकेत आले. त्यानंतर स्थायी समितीच्या सभागृहात सत्ताधारी गटाची बैठक झाली. या बैठकीत मदन पाटील यांच्या पत्राचे सामूहिक वाचन करण्यात आले. पाटील यांनी महापौर पदासाठी विवेक कांबळे व उपमहापौर पदासाठी प्रशांत पायगोंडा पाटील यांच्या नावाची शिफारस केली होती. त्यानंतर काँग्रेसने या दोन्ही उमेदवारांचे अर्ज शेवटच्याक्षणी दाखल केले.याच सुमारास काँग्रेसच्या वंदना कदम यांनीही अर्ज दाखल केल्याने सत्ताधारी गटाच्या भुवया उंचाविल्या. पतंगराव कदम यांनी सकाळीच दूरध्वनीवरून अर्ज दाखलची सूचना केल्याचा दावा कदम यांनी केला. त्यांच्या या दाव्याने सत्ताधारी गटातील संघर्ष चव्हाट्यावर आला असून, काँग्रेसमध्ये बंडाळीची चिन्हे दिसू लागली आहेत. कदम यांच्या अर्जावर अतहर नायकवडी व अश्विनी कांबळे या नायकवडी गटातील सदस्यांच्या सह्या आहेत. (प्रतिनिधी)काँग्रेस नेते पतंगराव कदम यांच्या आदेशाने अर्ज दाखल केला आहे. त्यांनी सकाळीच दूरध्वनीवरून सूचना केली होती. पालिकेत आल्यानंतर दुसऱ्याचे नाव जाहीर झाल्याचे कळले. अजूनही आपण आशावादी आहोत. कदम व मदन पाटील यांनी आदेश दिल्यास अर्ज मागे घेऊ. आपण कोणाच्याही संपर्कात नसून, अर्ज दाखल करणे म्हणजे बंडखोरी नव्हे. दोन्ही नेत्यांत एकमत झाले नसेल. आता ते एकत्रित चर्चा करून निर्णय घेतील.- वंदना कदम, काँग्रेसचमत्काराचा दावा फोल : जामदारमदन पाटील व पतंगराव कदम यांच्या आदेशाने अर्ज दाखल केले आहेत. काँग्रेसमध्ये कोणी नाराज असेल तर, त्यांची नेतेमंडळी समजूत काढतील. राष्ट्रवादीचा चमत्काराचा दावा ३१ रोजी फोल ठरेल. राजकारणात सर्वच गोष्टी सांगायच्या नसतात. ज्या-त्यावेळी त्या घडतात, अशी सूचक प्रतिक्रिया सत्ताधाऱ्यांचे गटनेते किशोर जामदार यांनी दिली. राष्ट्रवादीकडून महापौर पदासाठी शेडजी मोहिते व उपमहापौर पदासाठी राजू गवळी यांचे, तर स्वाभिमानी आघाडीकडून बाळू गोंधळी व शिवराज बोळाज यांचे अर्ज दाखल झाले. चमत्कार घडवू : सूर्यवंशीमहापौर व उपमहापौर पदाची निवडणूक लढविण्याचा निर्णय राष्ट्रवादीने घेतला आहे. या निवडीत आम्ही निश्चित चमत्कार घडविणार आहोत. काँग्रेसचे १५ नगरसेवक संपर्कात आहेत. राष्ट्रवादीचे सर्व नगरसेवक एकसंध असून, आम्ही आशावादी आहोत, असे विरोधी पक्षनेते दिग्विजय सूर्यवंशी यांनी सांगितले. व्हीपचा बडगाकाँग्रेसमधील बंडाळी व स्वाभिमानीतील भाजप व शिवसेना संघर्ष पाहता यंदा दोन्ही पक्षांकडून व्हीप बजाविण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. गटनेते किशोर जामदार यांनी व्हीप बजाविला जाणार असल्याचे स्पष्ट केले. काँग्रेसमध्येच बंडखोरी झाल्याने सदस्यांवर व्हीपचा बडगा उगारला जाणार आहे. स्वाभिमानीत विधानसभा निवडणुकीवेळी भाजप व शिवसेना अशी उभी फूट पडली होती. त्यामुळे भाजपला मानणारे सदस्य वेगळी भूमिका घेऊ नयेत, यासाठी शिवसेनेचे प्रयत्न सुरू आहेत.खास दूत धाडलादीड वर्षापूर्वी स्वीकृत नगरसेवक पदावरून काँग्रेस नगरसेवकांत मोठी नाराजी पसरली होती. यावेळीही सदस्यांची नाराजी टाळण्यासाठी मदन पाटील यांनी खास दूतामार्फत बंद लिफाफ्यातून महापौर व उपमहापौरांची नावे दिली. त्यांचे स्वीय सहाय्यक सतीश हेरवाडे यांनी हा लिफाफा सर्व नगरसेवकांच्या उपस्थितीत गटनेते किशोर जामदार यांच्याकडे सुपूर्द केला. नगरसेवकांसमोरच मदन पाटील यांच्या पत्राचे जाहीर वाचन करण्यात आले. या पत्रात सर्वाधिक नगरसेवकांनी विवेक कांबळे व प्रशांत पाटील यांच्या नावाला पसंती दिली असून, त्यांचे अर्ज दाखल करण्याचे आदेश देण्यात आले होते.