शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

या गरोदर महिलेचे प्राण कसे वाचले पहा... तुम्ही भविष्यात अशी मदत करू शकता..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2019 15:41 IST

रक्ताच्या माध्यमातून माणुसकीची नाती जपणाºया बॉम्बे ओ ब्लड ग्रुप आॅर्गनायझेशनने मुंबईतील   एका गरोदर महिलेचे प्राण वाचविले. अडचणींचे अनेक बांध तोडत आठ तासात

ठळक मुद्देमुंबईतील गरोदर महिलेचे बॉम्बे ओ ग्रुपने वाचविले प्राण

अविनाश कोळी । सांगली : रक्ताच्या माध्यमातून माणुसकीची नाती जपणाºया बॉम्बे ओ ब्लड ग्रुप आॅर्गनायझेशनने मुंबईतील   एका गरोदर महिलेचे प्राण वाचविले. अडचणींचे अनेक बांध तोडत आठ तासात त्यांनी केलेल्या रक्तपुरवठ्यामुळे रुग्णालय प्रशासन व रुग्णाच्या नातेवाईकांनी संघटनेच्या कार्याला सलाम केला.

मुंबई अंधेरीच्या फडके हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या हर्षदा सपकाळ या गरोदर महिलेची प्रकृती अचानक बिघडली. रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण ४ पेक्षा कमी झाले होते. रक्तगटाची तपासणी केल्यानंतर येथील डॉक्टरांना तिचा रक्तगट अत्यंत दुर्मिळ असल्याचे लक्षात आले. त्यांनी मुंबईतील सर्व रक्तपेढ्यांमध्ये चौकशी केली, मात्र त्यांना हा रक्तगट कुठेच मिळाला नाही. दुसरीकडे महिलेची प्रकृती तर चिंताजनक होत होती. रुग्णाच्या नातेवाईकांनी सोशल मीडियावर यासंदर्भात एक मेसेज व्हायरल केला. तो मेसेज फिरत तासगाव येथील बॉम्बे ओ ब्लड ग्रुप आॅर्गनायझेशनचे संस्थापक विक्रम यादव यांच्यापर्यंत गुरुवारी  पोहोचला. त्यांनी तातडीने रुग्णालयाशी संपर्क साधला व रुग्णाच्या प्रकृतीबाबत विचारणा केली. तातडीने रक्त मिळाले नाही, तर महिलेच्या जिवाला धोका होऊ शकतो, असे रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले. 

यादव यांनी हे आव्हान स्वीकारले. त्यांनी कार्वे (ता. कºहाड) येथील सुधीर निवृत्ती कणसे या रक्तदात्याशी संपर्क साधला आणि रुग्णाविषयी कल्पना दिली. मुंबईत वाहतूक कोंडी झाल्याने रक्त तातडीने पोहोचविणे हेच आव्हान होते. कणसेंंनी कºहाडच्या कृष्णा हॉस्पिटलमध्ये रक्तदान केले. ते रक्त गुरुवारी रात्री कºहाडमधून वातानुकूलित कार करून मुंबईत नेण्यात आले. त्या गरोदर महिलेचे  प्राण वाचविण्यात यश आले.  बॉम्बे ब्लड ग्रुपने दाखविलेल्या या तत्परतेने रुग्णाचे नातेवाईक भारावून गेले. त्यांनी सहभागी संघटनेचे आभार मानले.

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMumbaiमुंबई