शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नातेवाईकांनी झिडकारलेल्या शेतकऱ्याचा चटका लावणारा अंत -: दाहक वास्तव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 00:15 IST

आयुष्यातील अनेक धक्के सहन करूनही पुन्हा उभे राहू पाहणारा सांगली जिल्ह्यातील एक शेतकरी नात्यांच्या स्वार्थी सुरुंगाने उद्ध्वस्त झाला. त्याच्या हक्काच्या मालमत्तेवर हक्क गाजविणाºया त्याच्याच नातेवाईकांनी त्याला झिडकारून बेवारस केले.

ठळक मुद्देआयुष्याच्या सायंकाळी अनुभवली प्रेमाची ‘सावली’

अविनाश कोळी ।सांगली : आयुष्यातील अनेक धक्के सहन करूनही पुन्हा उभे राहू पाहणारा सांगली जिल्ह्यातील एक शेतकरी नात्यांच्या स्वार्थी सुरुंगाने उद्ध्वस्त झाला. त्याच्या हक्काच्या मालमत्तेवर हक्क गाजविणाºया त्याच्याच नातेवाईकांनी त्याला झिडकारून बेवारस केले. दाहक अनुभव घेत त्याच्या आयुष्याची सायंकाळ प्रेमाच्या शीतल ‘सावली’त गेली. तरीही मुलांच्या आठवणींनी तडफडत तो अखेर मृत्यूच्या बाहुपाशात अडकला.

पलूस येथील रुबाब बाळू मुल्ला (वय ७५) या शेतकºयाच्या आयुष्याची कहाणी मनाला चटका लावून गेली. ते मुल्लाचाचा म्हणून सांगलीच्या निवारा केंद्रात परिचित होते. अत्यंत सधन कुटुंबातले. शेती, घर, सर्व सुविधा अशा गोष्टी त्यांच्या आयुष्यात होत्या. अचानक त्यांच्या आयुष्याने कलाटणी घेत त्यांना वेदनांच्या खोल दरीत ढकलले. पत्नीचा मृत्यू झाला. तीन मुलांपैकी एक गेला, दुसरा बेपत्ता, तर तिसरा मुलगा किरकोळ कामे करून स्वत:चे पोट भरत आहे. त्यांचे अन्य नातलग आता या मालमत्तांवर हक्क गाजवत आहेत. त्यामुळे मुल्ला चाचांना त्यांनी झिडकारले. घराबाहेर काढले. यातून बेवारस म्हणून त्यांचा वेदनादायी प्रवास सुरू झाला.

सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या चाचांना सांगलीचे ‘सावली’ निवारा केंद्र लाभले. २८ जानेवारी २०१९ मध्ये त्यांचे केंद्रात आगमन झाले. उठ-बस करता येत नसल्याने ते झोपूनच होते. झोपून त्यांच्या शरीराला अनेक ठिकाणी जखमा होऊन जंतुसंसर्ग झाला. केंद्राचे प्रमुख मुस्तफा मुजावर यांनी आयुक्त रवींद्र खेबूडकर व उपायुक्त स्मृती पाटील यांना मुल्ला चाचांची कहाणी सांगितली. अधिकाऱ्यांचेही मन हेलावले. त्यांनी तातडीने आर्थिक तरतूद करून निवारा केंद्रात पाण्याची गादी आणण्यास सांगितले. त्यानंतर त्यांची सुश्रूषा करून कर्मचाºयांनी मुल्ला चाचांना बरे केले.

गेल्या तीन दिवसांपासून अचानक मुल्ला चाचांची मुलांच्या आठवणीने घालमेल झाली. त्यांनी जेवण सोडले. मुलांना, नातेवाईकांना भेटण्याची इच्छा व्यक्त करून ते तडफडू लागले. पण नातलगांनी त्यांना स्वीकारण्यास नकार दिला. निर्दयी नात्यांचा हा दाहक अनुभव घेत चाचांनी सोमवार, दि. १३ मे रोजी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मृत्यूनंतर मात्र त्यांचे नातलग लगेच दाखल झाले आणि त्यांनी अखेरची औपचारिकता पूर्ण केली.डोळे... कोरडे आणि अश्रूंनी भरलेलेमुल्ला चाचांच्या निधनानंतर सावली निवारा केंद्रातील कर्मचारी, त्यांचे सहकारी यांच्या डोळ्यांमधून अश्रू ओघळत होते, तर दुसरीकडे रक्ताच्या नात्यातल्या माणसांचे डोळे कोरडे ठणठणीत होते. समाजातील दाहक वास्तव दाखविणारा हा प्रसंग अनेकांनी अनुभवला. 

स्वार्थी नातेसंबंध पुन्हा अधोरेखितनात्यांमध्ये लपलेला स्वार्थ, संपत चाललेली माणुसकी, करुणा, आपुलकी, प्रेम केवळ मुल्ला चाचांच्या कहाणीतूनच स्पष्ट झालेले नाही. सावली निवारा केंद्रात अत्यंत कमी काळात अशा अनेक स्वार्थी कहाण्या अधोरेखित झाल्या.

टॅग्स :Sangliसांगलीsocial workerसमाजसेवक