शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

रावण, कंस, महिषासूर, दाभोळकर, कोकाटे फाडायचेच असतात; शरदबुवा घाग यांचे वादग्रस्त वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2023 18:13 IST

जाहीर वक्तव्य करत समाजात विद्वेष निर्माण करण्याची कृती केल्याने खळबळ

सांगली : त्या हिरण्यकश्यपूचं काय होतं हो, फाडतात त्याला हो, असे कितीतरी विष्णूंच्या विरोधात उभे राहणारे होते. हिरण्यकश्यपू, हिरण्याक्ष, रावण, कंस, महिषासूर, दाभोळकर, कोकाटे फाडायचेच असतात. जन्मकाळात नुसता सुंठवडा खाऊन नाही जायचं, काहीतरी ठरवून जायचं, असे विद्वेष पसरवणारे वक्तव्य नरसिंहवाडी (जि. कोल्हापूर) येथील शरदबुवा घाग या महाराजांनी केले आहे.आज देशभरात सगळीकडे जाती-धर्मात विष कालविणाऱ्या संप्रदायिकतेचा आगडोंब उसळलेला असतानाच सांगली जिल्ह्यातील क्रांतिकारकांचा आणि समाजसुधारकांचा तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाळवा तालुक्यातील नरसिंहपूर या गावातील श्री क्षेत्र ज्वाला नृसिंह तीर्थ मंदिराच्या श्री लक्ष्मी नृसिंह जयंती महोत्सवात शरदबुवा घाग या महाराजांनी हे द्वेषपूर्ण वक्तव्य केले. त्याची चित्रफित सध्या समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल हाेत आहे.वाळवा तालुक्यातील हे लक्ष्मी नृसिंह मंदिर जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. २७ एप्रिलपासून या मंदिरात जयंती महोत्सव सुरू आहे. ३० एप्रिलपासून ६ मेपर्यंत विविध कार्यक्रम या ठिकाणी झाले आहेत. दैनंदिन पूजा-अर्चा, भजन-कीर्तन अभिषेक, महापूजा, नैवैद्य, आरती, महापुष्प असे उपक्रम झाले. ६ मे रोजी झालेल्या लळिताच्या कीर्तन साेहळ्यात इतिहासातील हिरण्यकश्यपू आणि इतरांचे दाखले देत घाग महाराजांनी दाभोळकर आणि कोकाटे यांचा उल्लेख करत ते विष्णूंच्या विरोधात जात असतील तर त्यांना फाडायचेच असते, असे जाहीर वक्तव्य करत समाजात विद्वेष निर्माण करण्याची कृती केल्याने खळबळ उडाली. पुरोगामी कार्यकर्त्यांमधून संताप अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतरही अपशब्द वापरले गेले. तसेच इतिहास संशोधक, शिव व्याख्याते डॉ. श्रीमंत कोकाटे यांना जीवे मारून फाडून टाकण्याची धमकी या मंदिरासारख्या पवित्र तीर्थावरून दिली गेल्याने पुरोगामी आणि परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्त्यांमधून प्रचंड संताप व्यक्त होत आहे.

टॅग्स :Sangliसांगली