शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

हैदराबादमधील औषधांचा द्राक्षपट्ट्यात काळा बाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2019 16:53 IST

द्राक्षबागांसाठी लाखो रुपयांचा औषध फवारणीचा खर्च होतो. ब्रॅन्डेड औषधांच्या किमती जास्त असतात. त्यामुळे ब्रॅन्डेड कंपन्यांच्या तुलनेत निम्म्या किमतीत हैदराबादची औषधे सहजरित्या उपलब्ध होत असल्याने परराज्यातील औषधांना द्राक्षबागायतदारांकडूनच मागणी असल्याचे चित्र आहे. किंंबहुना तासगाव तालुक्यात या औषधांचा काळाबाजार खुलेआम सुरूअसून, कृषी विभागाच्या यंत्रणेकडून सोयीस्कर दुर्लक्ष सुरू असल्याचे बोलले जात आहे.

ठळक मुद्देहैदराबादमधील औषधांचा द्राक्षपट्ट्यात काळा बाजारकृषी विभागाच्या यंत्रणेकडून सोयीस्कर दुर्लक्ष

दत्ता पाटील तासगाव : द्राक्षबागांसाठी लाखो रुपयांचा औषध फवारणीचा खर्च होतो. ब्रॅन्डेड औषधांच्या किमती जास्त असतात. त्यामुळे ब्रॅन्डेड कंपन्यांच्या तुलनेत निम्म्या किमतीत हैदराबादची औषधे सहजरित्या उपलब्ध होत असल्याने परराज्यातील औषधांना द्राक्षबागायतदारांकडूनच मागणी असल्याचे चित्र आहे. किंंबहुना तासगाव तालुक्यात या औषधांचा काळाबाजार खुलेआम सुरूअसून, कृषी विभागाच्या यंत्रणेकडून सोयीस्कर दुर्लक्ष सुरू असल्याचे बोलले जात आहे.द्राक्षबागांना औषधांसाठी एकरी लाखभर रुपये खर्च करावा लागतो. विशेषत: दावण्या, बुरशीसारख्या रोगांसाठी औषधे महत्त्वाची मानली जातात. खराब हवामान असेल तर, एकाचदिवशी दोन-तीन वेळादेखील औषध फवारणी केली जाते.

दावण्यासारख्या रोगासाठी दोन हजार रुपयांपासून ते पाच हजार रुपयांपर्यंत एक किलो औषध विकत घ्यावे लागते. रोगप्रतिबंधासाठी अशी औषधे घ्यावीच लागतात. बाजारात देशी-विदेशी कंपन्यांची असंख्य ब्रॅन्डची औषधे उपलब्ध आहेत. मात्र या औषधांच्या किमती भरमसाठ आहेत.शेतकऱ्यांची गरज आणि मार्केटचा अंदाज घेत, तासगावच्या मार्केटमध्ये थेट हैदराबादच्या औषधांचा पुरवठा होत आहे. हैदराबादमध्ये द्राक्षासाठी लागणाºया औषधांची निर्मिती करणाºया कंपन्या आहेत. याच ठिकाणी कंपन्यांचे लेबल लावून, कंपनी चालकाच्या इच्छेनुसार किंमत निश्चित करून औषधे बाजारात येतात. त्याऐवजी शॉर्टकट वापरून थेट उत्पादन होणाºया कंपनीतील औषधे शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोच करणारी यंत्रणा कार्यान्वित झाली आहे.एका शेतकºयाने दिलेल्या माहितीनुसार, दावण्यासाठी बाजारात उपलब्ध असणारे एक औषध ४ हजार ७०० रुपयांना किलो विकत मिळते. हे औषध एक लिटरसाठी तीन ग्रॅमच्या प्रमाणानुसार वापरायचे आहे. तर हैदराबादमधून असेच एक किलो औषध १८०० रुपयांना मिळते. मात्र हे औषध एक लिटर पाण्यासाठी एक ग्रॅम वापराचे प्रमाण आहे.हैदराबादमधून मिळणारी बहुतांश औषधे बाजारभावापेक्षा सरासरी निम्म्या किमतीत मिळतात. अनेक वर्षांपासून या औषधांचा वापर करून फायदाच झाल्याचा दावा काही शेतकºयांकडून केला जात आहे. ब्रॅन्डेड कंपन्यांकडूनच मोठ्या प्रमाणात दर आकारणी करून शेतकºयांची फसवणूक केली जात असल्याचे म्हटले जात आहे.दुसरीकडे हैदराबादहून येणारी सर्व औषधे विनापरवाना आणि बेकायदेशीर आहेत. या औषधांचा ब्रॅन्ड नाही. किंबहुना खरेदीची कोणतीही बिले नाहीत. त्यामुळे नुकसान झालेच, तर दाद मागण्याचा पर्यायही नाही. त्यामुळे स्वस्त दराची रिस्क असल्याचेही सांगितले जाते. खुलेआमपणे सुरू असलेल्या या काळ्या बाजाराकडे कृषी विभागाचे मात्र सोयीस्कर दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :fruitsफळेSangliसांगली