शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कनेक्शन नसणाऱ्या शिधापत्रिकाधारकांना आता 100 रूपयांत मिळणार गॅस कनेक्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2019 13:27 IST

सांगली  : महाराष्ट्रामध्ये 15 जुलै ते 15 ऑगस्ट या कालावधीत अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडून पंडीत दीनदयाळ ...

ठळक मुद्देकनेक्शन नसणाऱ्या शिधापत्रिकाधारकांना आता 100 रूपयांत मिळणार गॅस कनेक्शनसांगली जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे यांनी दिली माहिती

सांगली : महाराष्ट्रामध्ये 15 जुलै ते 15 ऑगस्ट या कालावधीत अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडून पंडीत दीनदयाळ उपाध्याय अंत्योदय अभियानाअंतर्गत ह्लधुरमुक्त महाराष्ट्रह्व ही संकल्पना राबविली जात आहे. यामध्ये ज्यांच्याकडे गॅस कनेक्शन नाही अशा सर्व शिधापत्रिकाधारकांना 100 रुपयांत गॅस कनेक्शन मिळणार आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे यांनी दिली.श्रीमती बारवे म्हणाल्या, जिल्हयामध्ये एचपी, बीपी, आयओसी या कंपन्यांच्या एकूण 78 गॅस एजन्सी आहेत. त्याचप्रमाणे एकूण 6 लाख 47 हजार 646 गॅस कनेक्शन आज रोजी जिल्ह्यामध्ये कार्यरत असून त्यापैकी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेतून 1 लाख 3 हजार 781 इतके तर रेग्यूलर 5 लाख 43 हजार 865 इतके कनेक्शन आहेत. आज रोजी जिल्ह्यामध्ये केरोसिन पात्र शिधापत्रिकाधारकांना एकूण 264 किलो लीटर इतका केरोसिनचा पुरवठा केला जात आहे.

धुरमुक्त महाराष्ट्र ही संकल्पना राबविण्यासाठी ज्या कुटुंबाकडे गॅस कनेक्शन नाही त्या कुटुंबातील महिलेने प्रधानमंत्री उज्ज्वला योजना विस्तारीत 2 मधून केवायसी फॉर्म मध्ये नमूद 14 निकषांवर आधारित असलेले हमीपत्र भरून द्यावयाचे आहे. त्यासोबत रेशनकार्ड झेरॉक्स, रेशनकार्डमधील सर्व व्यक्तींचे आधारकार्डाची झेरॉक्स, दोन फोटो, बँक पासबुकाची झेरॉक्स लगतच्या गॅस एजन्सीकडे द्यावे किंवा केरोसिन दुकानदाराकडे द्यावे.

कागदपत्रांची छाननी पूर्ण होताच 100 रुपयांत गॅस कनेक्शन मिळणार आहे. जे केरोसिन घेत असणारे शिधापत्रिकाधारक हमीपत्र भरून देणार नाहीत त्यांच्याकडे यापूर्वीच गॅस कनेक्शन आहे असे समजले जाईल. केवायसी व हमीपत्र सर्व गॅस एजन्सी तसेच केरोसिन दुकानादारांकडे उपलब्ध असणार आहेत. जिल्ह्यातील सर्व गॅस एजन्सीज आणि तहसिलदार यांना 100 रुपयांत गॅस कनेक्शनबाबत जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे घेण्यात आलेल्या बैठकीमध्ये सुचना देण्यात आलेल्या आहेत.

 

टॅग्स :Cylinderगॅस सिलेंडरSangliसांगली