शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

एफआरपीपेक्षा जास्त दर म्हणजे फसवणूक : कोले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2019 16:16 IST

उसाचा उतारा आणि साखरेचा देशांतर्गत शिल्लक साठा पाहता, एफआरपीपेक्षा जास्त दर म्हणजे शेतकऱ्यांची फसवणूक असल्याचा आरोप शरद जोशीप्रणित शेतकरी संघटनेचे नेते संजय कोले यांनी केला. रघुनाथदादा पाटील आणि राजू शेट्टी शेतकऱ्यांना फसवत असल्याचेही ते म्हणाले. पहिल्या उचलीपेक्षा अंतिम दर किती देणार, हे कारखान्यांनी स्पष्ट करण्याची मागणी त्यांनी केली.

ठळक मुद्देएफआरपीपेक्षा जास्त दर म्हणजे फसवणूक : कोलेरघुनाथदादा पाटील आणि राजू शेट्टी शेतकऱ्यांना फसवत आहेत

सांगली : उसाचा उतारा आणि साखरेचा देशांतर्गत शिल्लक साठा पाहता, एफआरपीपेक्षा जास्त दर म्हणजे शेतकऱ्यांची फसवणूक असल्याचा आरोप शरद जोशीप्रणित शेतकरी संघटनेचे नेते संजय कोले यांनी केला. रघुनाथदादा पाटील आणि राजू शेट्टी शेतकऱ्यांना फसवत असल्याचेही ते म्हणाले. पहिल्या उचलीपेक्षा अंतिम दर किती देणार, हे कारखान्यांनी स्पष्ट करण्याची मागणी त्यांनी केली.कोले म्हणाले, यंदा महापुरामुळे उसाची कमतरता असल्याची भीती दाखवली जात आहे. काही भागात ऊस बुडाला असला तरी, अन्यत्र भरपूर पावसामुळे ऊस चांगला पोसला आहे. कारखाने एप्रिलपर्यंत चालतील. गतवर्षीची १४० लाख टन साखर शिल्लक आहे.

यंदा पुन्हा २७० लाख टन उत्पादन होणार आहे. देशांतर्गत खप २६० लाख टन आहे. वीस लाख टन इथेनॉलसाठी खर्ची पडेल. उर्वरित साखरेचे काय करणार, हा प्रश्न आहे. गेल्या हंगामात शेतकऱ्यांना टनामागे ५०० ते १२०० रुपये कमी मिळालेत. स्वाभिमानी संघटना एकरकमी उचलीची भाषा करते, पण अंतिमत: कमीच पैसे मिळतात. त्यामुळे त्यांचे आंदोलन फसवे आहे.ते म्हणाले, पहिली उचल एकरकमी मिळाली तरी, शेवटच्या शेतकऱ्यांना पूर्ण बिले मिळत नाहीत. त्यामुळे एफआरपीपेक्षा जास्त दर मिळत नाही, हे स्पष्ट आहे. सरकारने साखरेचा दर ३ हजार १०० रुपये निश्चित केला आहे. त्यामुळे साखरेतून कारखान्यांना पुरेसे पैसे मिळणार नाहीत.

नव्या साखरेवर ९० टक्क्यांपर्यंत कर्ज मिळेल, तरीही कारखाने जादा दर देऊ शकणार नाहीत. साखर, मोलॅसिस, बगॅसचा हिशेब एकत्र केला तरी, टनाला ३ हजार ८४७ रुपये उत्पन्न मिळेल. गाळप, तोडणी व वाहतुकीचा खर्च वगळता हातात २ हजार ५९७ रुपयेच उरणार आहेत.दोन्ही संघटना जादा दराचे आमिष दाखवून शेतकऱ्यांना फसवत आहेत. कर्नाटकची राज्यबंदी म्हणजे थोतांड आहे. काही कारखान्यांची नोंदणी बहुराज्यीय असल्याने ते कर्नाटकातून ऊस आणणार हे स्पष्ट आहे, असेही ते म्हणाले.यावेळी बाशेखान मुजावर, शंकर कापसे, अल्लाउद्दीन जमादार, एकनाथ कापसे, यशवंत कवठेकर, सचिन गवळी आदी उपस्थित होते.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेSangliसांगली