शहरं
Join us  
Trending Stories
1
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
2
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
3
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
4
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
5
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
6
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
8
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
9
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
10
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
11
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
12
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
13
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
14
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
15
‘जन्माधारित नागरिकत्व’चा ट्रम्प यांचा निर्णय कोर्टाकडून स्थगित; अमेरिकेतील भारतीयांना दिलासा
16
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष
17
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
18
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
19
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
20
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!

सांगलीतील अनुगडेवाडीत आढळला दुर्मिळ 'मलबारी मैना' 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2023 18:20 IST

नर-मादी दोघेही पिलांची काळजी घेतात

किरण सावंत

सावंतपूर: महाराष्ट्रात अत्यंत दुर्मिळ असणारा मलबारी मैना हा पक्षी पलूस तालूक्यातील अनुगडेवाडी आमणापूर परिसरात  आढळला. अनुगडेवाडी येथील काळ्या ओढ्यावरील पूलाच्या परिसरात पिंगळा घुबड, मलकोवा, सुभग, शिंजीर, निखार, राखी धनेश अशा दुर्मिळ पक्षांचे दर्शन झाले आहे. यंदा प्रथमच या परिसरात मलबार मैनाची नोंद झाली आहे. पक्षीप्रेमी संदीप नाझरे यांनी त्यांची नोंद केली.मलबारी मैना किंवा करड्या डोक्याची मैना आशिया खंडातील बहुतेक देशात आढळतात. ईशान्य भारत, नेपाळ, भूतान, बांगलादेश आणि वायव्य बर्मा दक्षिण चीन, तैवान, बर्मा, थायलंड, लाओस, व्हिएतनाम आणि कंबोडिया आदि देशात हा पक्षी आढळतो. भारत आणि इंडोचीनच्या मैदानी आणि टेकड्यांवर राहतात. हिवाळ्यात हिमालयातील तळभागातून ते काठमांडू खोऱ्यात जातात. समुद्रसपाटीपासून 800 मीटरच्यावर डोंगराळ प्रदेशात हे पक्षी आढळत नाहीत. शहरी भागात या पक्ष्याचा वावर सामान्य असला तरी ते विरळ झाडे व जंगली भागात असलेल्या मोकळ्या जागेत वावरतात. हे पक्षी थव्याने वावरतात. कीटक जसे वाळवी, सुरवंट माश्या, फळे, परागकण आणि वनस्पतींचे फुले खातात. प्रथम दर्शनी ब्रामणी मैनासारखा वाटणारा हा गाणारा पक्षी आहे. लांबी 20 सेमी असते. शरीराचा वरचा भाग राखाडी असतो. पंखांचा व शेपटीचा रंग काळा असून डोक्यावर राखाडी रंगाची पिसे असतात. चोच लहान असून डोळ्याची बूबले पांढरी असतात. चोच फिक्कट निळी व पिवळी असते.नर-मादी दोघेही पिलांची काळजी घेतातविणीचा हंगाम सामान्यतः फेब्रुवारीच्या सुरुवातीपासून जूनपर्यंत असतो. ३ ते १२ मीटर उंचीवर झाडाच्या पोकळीत घरटे बांधतात. ते सुतार पक्षी किंवा बार्बेट्सची जुनी घरटी वापरतात. मादी एकावेळी निळ्या हिरव्या रंगाचे ठिपके असलेली 3-5 अंडी घालते. नर-मादी दोघे मिळून घरटे बांधतात व आळीपाळीने १५ ते १७ दिवस अंडी उबवतात. नर-मादी दोघे ही पिलांना भरवतात व पिलांची काळजी घेतात. पिल्ले 19-21 दिवसांत भरारी घेण्यास सज्ज होतात.

टॅग्स :Sangliसांगली